रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कारावमध्ये सन २०१८ ते २०२२ व फेब्रुवारी २०२३ पर्यंतच्या कालावधीत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने ग्रामपंचायतीच्या तिजोरीतील कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदार मंगेश काशिनाथ म्हात्रे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी अनेक सरकारी कार्यालयांमध्ये अर्ज दाखल केले आहेत. पेण पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी यांनी दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी चौकशी सुरू केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
तक्रारदार मंगेश म्हात्रे यांनी या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केले. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्यामुळे त्यांनी प्रजासत्ताक दिनी, म्हणजेच दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.