पनवेल मधील जय भारत नाक्यावरील आदित्य देवदास बिल्डिंग येथे दिनांक ३ जानेवारीच्या रात्री २ च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच , पनवेल महापालिकेच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने इमारती मधील सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढून आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळविले.
पनवेल मधील जय भारत नाक्यावरील आदित्य देवदास बिल्डिंग येथे दिनांक ३ जानेवारीच्या रात्री २ च्या सुमारास तळमजला तसेच पहिला व दुसरा मजला या ठिकाणी आग लागलेली होती. पनवेल महापालिकेच्या दोन अग्निशमन दलाने होजरील होजच्या साह्याने कुलिंगचे काम केले. बिल्डिंगला लॅडर लावून बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर आग लागलेल्या लकी बॅग्स दुकानातील साहित्य बाहेर काढून कुलिंगचे काम केले. तसेच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या जेष्ठ नागरिक, मुले महिला अशा एकूण 11 रहिवाशांना रेस्क्यू करून सुखरूप बिल्डिंगच्या खाली आणले.
घटनास्थळी अग्निशमन केंद्र अधिकारी हरिदास सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली लिडिंग फायरमन वैभव ओंबसे ,मंदार म्हात्रे व पनवेल ,नवीन पनवेल अग्निशमन दलाचे वाहनाच्या माध्यमातून कर्मचारी यांनी तत्परतेने आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. आदित्य देवदास बिल्डिंग मुख्य बाजार पेठेत असून वेळेत महापालिकेचे अग्निशमन दल पोहोचल्याने पुढील मोठी हानी टळली. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी पनवेल महानगरपालिका अग्निशमन दलाचे कौतुक केले. यावेळी पनवेल शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व माजी नगरसेविका नीता माळी उपस्थित होत्या.
मा.आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका नागरिकांना सेवा व सुविधा देण्यासाठी तत्पर असून महापालिकेचा अग्निशमन दल अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.