NMMC ची बेघरांविरुद्ध धडक कारवाई – अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर

बेलापूरमध्ये NMMC ची बेघरांविरुद्ध धडक कारवाई - अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर
पनवेल : 
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाने बेलापूर विभाग येथे धडक कारवाई केली.
नेरुळ सेक्टर 25 येथील मलनिस्सारण केंद्राच्या (STP) मागे असलेल्या २५ अनधिकृत झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले. याबरोबरच, सेक्टर-42, सिवूड्स, L&T ब्रिजखालील भागातील बेघरांचे अतिक्रमण देखील हटवण्यात आले.
ही कारवाई बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत अतिक्रमण विभागातील कर्मचारी, पोलिस यांच्यासह JCB – 01, मजुर – 10 आणि आयचर वाहन – 01 यांचा वापर करण्यात आला.
महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, यापुढे अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading