PEN न्यूज ऑनलाइन टीम :
नोकरीच्या शोधात असणार्या उमेदवारांसाठी नॅशनल फर्टीलाइजर लिमिटेड (NFL) मध्ये रिक्त पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजमेंट ट्रेनी अशी पद भरण्यात येणार आहेत. या साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदसंख्या :– एकूण ३४९ जागा
पदाचे नाव :-
१. नॉन एक्झिक्युटिव्ह – या पदासाठी एकूण ३३६ जागा भरायच्या आहेत.
२. मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी एकूण १३ जागा भरायच्या आहेत.
शैक्षणिक पात्रता :-
१. नॉन एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी परीक्षा किमान ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित शाखेतील पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
२. मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी – CA/CMA or MBA (Finance) या शाखेमध्ये ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेले असावे.
वेतन :-
१. नॉन – एक्झिक्युटिव्ह या पदासाठी सुरुवातीला दरमहा २१,५०० रुपये पगार देण्यात येईल. तो पुढे ५६,५०० रुपयांपर्यंत जाईल.
२. मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी सुरुवातीला दरमहा ४०,००० रुपये पगार देण्यात येईल. तो पुढे १, ००,००० रुपयांपर्यंत जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ८ नोव्हेंबर २०२४