Murud : कोट्यावधींची फसवणूक करणारा मौलाना तब्बल सात महिन्यांनी कोचिन विमानतळावर जेरबंद

Murud Maulavi Bandarkar
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात बाराजणाची एक कोटी अठ्ठात्तर लाख रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपी रियाज अहमद कासिम बंदरकर(रा. सुरुळपेठ मज्जीद, नांदगाव, ता. मुरुड़, जि. रायगड) यास तब्बल सात महिन्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केरळ राज्यातील कोचिन विमानतळावरून ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सुरुळपेठ येथील मज्जिद येथे मौलाना म्हणून कार्यरत असणाऱ्या रियाज अहमद कासिम बंदरकर, याने अर्थिक अडचणीचा फायदा घेवुन दरमहा घरखर्चासाठी पैसे मिळतील असे सांगत दिनांक २मे२०२३ते ०९जून २०२४ दरम्यान फिर्यादी सलमा अन्वर घलटे, (वय-५१वर्षे, व्यवसाय-गृहीनी, रा. आगरदांडा, मुरुड ता. मुरुड जि. रायगड) याची रुपये सहा लाख तर इतर अकरा जणांची एक कोटी बाहात्तर लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच फिर्यादी सलमा अन्वर घलटे यांच्याकडून तब्बल सहा लाख रुपये स्टेट बँक ऑफ च्या धनादेशाद्वारे घेऊन त्या रक्कमेचे करार पत्र देऊन फसवणूक केली होती.
फिर्यादी सलमा अन्वर घलटे आणि इतर अकरा जणांनी यानी आरोपी रियाझ बंदरकर याच्याकडे दिलेल्या पैशाची वेळोवेळी मागणी केली असता रियाझ याने उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेत होता. अखेर फिर्यादी सलमा आणि अकरा जणांनी दिनांक ०३/०८/२०२४, रोजी मुरुड पोलिस ठाण्यात रियाझ बंदरकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
मुरुड पोलिस ठाण्यात ११०/२०२४, भा.द.वि. कलम ४२०,४०६ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंरक्षण अधिनियम (एमपीआयडी) १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
या दरम्यान आरोपी रियाझ हा भारताबाहेर दुबई येथे पळून गेल्याने पोलिसांना त्याला अटक करता आली नाही. त्यानंतर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने
सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभितजित शिवथरे यांच्यां मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या पथकाने तब्बल सात महिन्यानंतर आरोपी हा कोचिन विमानतळावरून पुन्हा देशाबाहेर जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक नारे यांच्या पथकाने कोचिन येथे जाऊन विमान तळावरून दिनांक २५ मार्च २०२५रोजी रात्रीच्या वेळी ताब्यात घेत अलिबाग येथे आणले. आरोपी रियाझ यास अलिबाग येथील न्यायाधीश निळकंठ यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास २एप्रिल २०२५पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपी रियाझ बंदरकर यास कोचिन येथून ताब्यात घेऊन आल्याची वार्ता ही फिर्यादी यांच्यासहित इतर पीडितांना मिळताच त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात एकच गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading