Mumbai-Goa Highway Accident: माणगांव येथे दोन कारची समोरा-समोर जोरदार धडक; आठ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Mumbai-Goa Highway Accident: माणगांव येथे दोन कारची समोरा-समोर जोरदार धडक; आठ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
रायगड ( अमुलकुमार जैन ) : 
 मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहरातील बाजारपेठेलगत एकता पेट्रोल पंपाच्या अलीकडे व मोतीराम प्लाझाच्या समोरील वळणावर दोन कारचा समोरासमोर अपघात होवून आठ जण जखमी झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याचे काम गेली अनेक वर्षापासून रखडले आहे. या राष्ट्रीय महामार्गावर मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत हजारो जणाचा नाहक बळी गेले आहे तर हजारो जण जखमी झाले आहेत.असाच एक भयानक अपघात माणगांव बाजारपेठेलगत एकता पेट्रोल पंपाच्या अलीकडे व मोतीराम प्लाझाच्या समोरील वळणावर घडला. हा अपघात एक्सएल सिक्स कार व वॅगनर कार यांच्यामध्ये घडला आहे.
या दोन कारमध्ये झालेल्या अपघाताची भयानकता इतकी होती की एक्सएल सिक्स कार व वॅगनर कार यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये आठ प्रवासी गंभीररित्या जखमी असून एका सहा वर्षीय लहान मुलीचाही समावेश आहे. बाकी किरकोळ जखमी झाली असून दोन्ही वाहनांचे खूप नुकसान झाले आहे…
सदर अपघातामधील मुंबईकडे जाणारी वॅगनर कार क्र. एमएच ०१ सीआर ३५५३ व मुंबई बाजूकडून खेडकडे जाणारी मारूती नेक्सा गाडी एक्सएल सिक्स क्र. एमएच ०८ एएक्स ६०६८ या गाड्यांमध्ये हा अपघात घडला. या दोन्ही गाड्यांमध्ये चालकासहित ४-४ असे एकूण ८ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये मुंबईकडून खेडकडे जाणाऱ्या एक्सएल सिक्स कारमध्ये चालक निलेश जोगळे, प्रवासी महिला अनिता गिल्डा, स्मिता बुटाला, वर्षा चिंडक (सर्व रा. खेड जि. रत्नागिरी) तर गुहागरकडून मुंबईकडे जाणारी वॅगनर कारमधील कुटुंब चालक विकास भागवत, ज्योती भागवत, ऋग्वेद भागवत, चार्वी भागवत (सर्व रा. गुहागर व सध्या रा. मुंबई) अश्या ८ जणांचा समावेश आहे. या अपघातात ८ जण जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले. वॅगनर कारमधील २ जणांची प्रकृती अती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्य आले आहे.
अपघाताची घटना समजताच माणगांव शहरातील युवक रामनवमी उत्सव कमिटी सदस्य तसेच माणगांव तालुका शिवजयंती उत्सव कमिटीचे सभासद तसेच माणगांव पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. शि. भारत वामन, पो. शि. पिंपळे, यश गालिंदे व गृहरक्षक जवान हजर राहिले व अपघातातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघाताची भयानकता अतिशय गंभीर होती आणि विशेष म्हणजे या अपघातात २ चिमूकले आणि ३ वयोवृद्ध महिलांचा समावेश होता.
सदर या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading