मुंबई -गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका संपण्याचे काही नावच घेत नाही. दररोज महामार्गावर कुठे ना कुठे तरी अपघातात घडत असतांनाच महामार्गावर अपघातासाठी अत्यंत धोकादायक खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिंडीच्या उतारावरती खैरवाडी स्टाॅपच्या समोर ट्रेलर डिवायर्डरला धडकुन भीषण अपघात झाला. हा अपघात ईतका भयंकर होता की या अपघातात ट्रेलर चालक जागीच ठार झाला आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, कोलाड बाजुकडुन वाकणच्या दिशेने कंटेनर घेऊन जाणारा ट्रेलर क्रं. एम.एच.४६ बी.एम. ६३३१ सुकेळी खिंडीच्या उतारावरती आला असता ट्रेलर चालकाचे आपल्या ताब्यातील गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर सरळ जाऊन डिवायर्डरला धडकला . त्यामुळे ट्रेलरवर असलेला कंटेनर १० ते १५ फुट अंतरावर उडुन ट्रेलर देखिल पुर्णपणे पलटी झाला. त्यामुळे ट्रेलर चालक पवन शिवाजी जाधव (वय- ३३) हा केबिनमध्येच अडकुन जागीच ठार झाला. सुदैवाने अपघात झाला त्यावेळी दुसरे कोणतेही वाहन तेथुन जात नव्हते त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. सदरील हा अपघात सोम.(दि.१६) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच वाकण टॅबचे कर्मचारी तसेच ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य मनोहरभाई सुटे, किशोर नावले यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व हायड्राच्या सहाय्याने ट्रेलरचालकाला केबिनमधुन बाहेर काढण्यात आले असुन त्यास जिंदाल रुग्णालयाच्या रुग्णवाहीकेतुन नागोठणे सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.