Mumbai-Goa highway Accident : कारची ट्रकला मागून जोरदार धडक

Accident Sukeli1
सुकेळी ( दिनेश ठमके) :
मुंबई -गोवा महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरुच असतांनाच गुरु( दि.२१) रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास सुकेळी येथिल जिंदाल कंपनीच्या समोर कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन कार चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. 
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सुकेळी येथिल जिंदाल कंपनीच्या समोर एस. एम. ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक क्रं. एम . एच. ४३ सी. के. १६९४ चालक हा आपल्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा करुन बाजुला असलेल्या दुकानामध्ये गेला होता. याचदरम्यान नागोठणे बाजुकडुन भरधाव वेगाने येणारी कार क्रं. एम.एच.२० जी.क्यु. ०४६० चालक विशाल रमेश कदम( ( वय- २९) रा. माणगाव याचे आपल्या कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार सरळ जाऊन ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन धडकुन कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
कारमधिल एअर बॅग उघडल्यामुळे कार चालक बालंबाल बचावला मात्र त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. यावेळी येथिल स्थानिक युवा कार्यकर्ते सतिश सुटे, निखिल करंजे आदि ग्रामस्थांकडून कारमधिल दुखापतग्रस्तांना प्रथमोपचारासाठी मदतीचा हात देऊन जिंदाल कंपनीच्या रुग्णवाहिकेतून जिंदाल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र यावेळी ट्रक चालकाने तेथुन पळ काढला .‌ यावेळी जिंदाल रुग्णालयातील डाॅ. मनिष रायकवार यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी पनवेल येथे पाठविण्यात आले .
दरम्यान वाकण टॅबच्या सहायक पोलिस निरीक्षक गितांजली जगताप यांच्यासह त्यांचे संपुर्ण कर्मचारी तसेच नागोठणे पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्षदर्शींनी पाहणी करुन अपघातग्रस्त दोन्हीही वाहने रस्त्यावरुन बाजुला करुन वाहतूक सुरळीतरित्या सुरू करण्यात आली. तसेच महामार्गावर सुकेळी जिंदाल कंपनीच्या समोर काॅईल घेऊन जाणा- या ट्रेलरच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागत असुन त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातात घडत आहेत त्याबाबतीत योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांकडून बोलण्यात येत आहे. नागोठणे पोलिस स्टेशनमध्ये फोन केला असता याबाबतचा  कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading