मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील मौजे कोलेटीवाडीचे पुढे गांधे फाट्या (आमटेम)नजिक तारळ धुमाळवाडी राजापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या बसवरील चालकास झोपेची डुलकी लागल्याने बस पलटी होवून अपघात झाल्याने चालक सहित सव्वीस जण जखमी झाले असल्याबाबतची फिर्याद अनिकेत सखाराम धुमाळ ( कांजूरमार्ग मुंबई) यांनी विनोद चंद्रकांत हळदणकर(रा. चांभारभाटीवाडा देवगड जि सिंधुदुर्ग ) यांच्या विरोधात वडखळ पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तारळ धुमाळवाडी राजापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या बसवरील चालक विनोद हळदणकर हा त्याच्या ताब्यात असणारी बस क्र एमएच४७-बीएल-६२९९ घेवुन मुंबईकडे जात असताना सदर बस रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील मौजे कोलेटीवाडीचे पुढे आमटेम नजीक आली असता चालक विनोद हळदणकर यास झोपेची डुलकी लागली असता बस ही रस्त्याच्या खाली जावून पलटी बसचा अपघात झाला आहे.
या बसमध्ये असणाऱ्या रुपाली सखाराम धुमाल,सखाराम गंगाराम धुमाल, अनिकेत सखाराम धुमाल तिन्ही रा कांजुरमार्ग मुंबई इस्ट, वंदना वसंत खोचाडे रा अंधेरी मुंबई, सुमित अनंता बाणे रा विरार मुंबई, समर्थक सचिन जाधव रा अंधेरी मुंबई, वसंत तानु खोचोडे रा अंधेरी मुंबई, रिहान सिराज पटणी रा अंधेरी मुंबई,अनिल सोनी गावकर रा नालासोपारा मुंबई, सत्यवान काशिराम पगारे रा वडाला मुंबई, प्रमोद मधुकर कांबळे रा वडाला मुंबई, प्राजक्ता प्रमोद कांबळे रा वडाला मुंबई,मयुरेश प्रमोद कांबळे रा वडाळा मुंबई, विनायक आत्माराम घडशी रा घाटकोपर मुंबइ, विनोद चंद्रकांत हळदणकर रा चांभारभाटीवाडा सिंधुदुर्ग, मंगेश भगवान नाकटे रा घाटकोपर मुंबई,पुरुषोत्तम गणपत कदम रा अंधेरी मुंबई, संकेत अनिल तारी बोंडगाव सिंधुदुर्ग, मनोहर शंकर आंबेरकर रा बोरीवली मुंबई, २०. प्रतिभा कृष्णा यादव रा सडेवाल घोटन रत्नागिरी, अमिता अनंत बाणे रा विरार मुंबई, प्रसाद राजेंद्र हांडे रा नालासोपारा मुंबई, जयश्री जयवंत आंबेरकर रा नडगीरे सिंधुदुर्ग, स्वप्नील संजय यादव रा विरार मुंबई, नकुल रामचंद्र सागवेकर रा कांजुरमार्ग मुंबई, सुनिता सिध्दार्थ कोंडकर रा वडाळा मुंबइ. आदींना लहान मोठ्या गंभीर स्वरुपाच्या दुखापती होवुन बसचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे.
गुन्हा. रजि.नं.व कलम- वडखळ पोलीस ठाणे T सी आर नं. १७९/२०२४ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (ए), १२५ (बी), एम. व्ही. अॅक्ट १८४ प्रमाणे दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सोनावळे हे करीत आहेत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.