पेण :
मुंबई गोवा महामार्गाचे काम गेले बारा तेरा वर्षापासून सुरू असून काम पूर्ण होण्यासाठी ‘तारीख-पे-तारीख’ असा गालिच्च प्रकार सुरू आहे. हा मार्ग व्हावा यासाठी अनेक सामाजिक संस्था तसेच शेतकर्यांनी आंदोलने केली परंतु आजतागायत हवे तसे काम नझाल्याने नाराजीचा सुर उमटत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
आजही रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्ज्याचे आहेच त्याचबरोबर महामार्ग बाधित ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्या आहेत. त्या मागण्या महामार्ग प्राधिकरण व शासनाकडून सोडवल्या जात नसल्याने पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्ग असलेल्या पांडापूर गावातील ग्रामस्थांच्या महामार्ग रुंदीकरणात जागा गेली आहे. त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यासंदर्भात शासनाकडे व महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार मागणी करून देखील या मागण्यांकडे शासनाने व महामार्ग प्राधिकरणाने लक्ष न दिल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या पुर्ण होण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महामार्गाचे काम रोखण्याचा पवित्रा घेतला.
अश्या आहेत मागण्या
-
गावच्या पश्चिमेकडे शेतीवर जाणेसाठी भुयारी मार्ग बांधने राष्टीय महामार्ग प्रधिकरणाकडुन कडून स्थळ पाहणी बऱ्याच वेळा झाली परंतु प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नाही ते काम सुरु करावे.
-
पावसाचे पुराच्या पाण्याचे सांडपाणी विसर्ग होणेसाठी मोरीची रुंदीकरण करावे, मो-यांचे काम निकुष्ट दर्जाचे असुन जुन्या मो-यांवरच क्राॅक्रीट टाकले आहे तर मो-यांच्या स्लॅबच्या लोखंडी सळ्याा बाहेर आल्या आहेत येथे अपघात होण्याची शक्यतााआसल्याने या मो-यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे व या मो-यांचे काम नव्याने करावे,या मो-या व नाळे साफ करावेत,
-
१९८९ व २००५ रोजी आलेल्या पुरामध्ये मोरीतून विसर्ग न झाल्याने पुराचे पाणी नाल्यामध्ये शिरले व ४५ कुटुंब पूरग्रस्त झाली. यावेळेस रस्त्याची उंची १ मीटरणे वाढली आहे. पुनश्च पूर आल्यास संपूर्ण गावामध्ये पुराचे पाणी गावात जाण्याची शक्यता आसल्याने मो-यांचे काम लवकर करावे .
-
महामार्गाचे रुंदीकरणात हनुमान मंदिराची विहीर बुजविली गेली आहे. नवीन विहीर बांधून मिळावी महामर्गाचे रुंदीकरणात बांधित झालेला तलाव बांधून मिळावा. महामार्ग बाधित झाडांचे नुकसानीची रक्कम मिळावी.
-
महामार्ग बाधित धर्मशाळेचे रक्कम मिळावी व ती रक्कम गावाच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये जमा करावी.
-
महामार्ग बाधित हनुमान मंदिराला मंदिराला वाढीव दिलासा रक्कम मिळावी.
-
महामार्ग बाधित ग्रामस्थांना विस्तारीत गावठाण मिळावा- २०१५ साली बाधित कुटुंबांची घरे शासनाकडून तोडली गेली आहेत. परंतु तुटपुंजी रक्कम व जागा उपलब्ध होत नसल्याने गावांत ग्रामस्थ भाड्याने राहत आहेत. तरी ग्रांस्थांसाठी शासनाने गावठान उपलब्द करुन द्यावा