
बाप्पाचा जयजयकार करत चाकरमानी मार्गस्थ होतील : Cm यांना विश्वास
महाड ( मिलिंद माने ) :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असणारा कशेडी घाटातील दुसरा भुयारी बोगदा ३ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करणार असून गणेश भक्त या दोन्ही बोगद्यातून गणपती बाप्पा चा जयजयकार करत मार्गस्थ होतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेडी बोगद्याच्या पाहणी दरम्यान दिली होती मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग पाहता ३ सप्टेंबर पर्यंत हा दुसरा बोगदा चालू होणार का असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे.
मागील १७ वर्षे चर्चेत असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून यंदाही कोकणातील टाकरमान्यांना खड्ड्यातूनच गणेशोत्सव काळात प्रवास करावा लागणार आहे राष्ट्रीय महामार्गावर पळस्पे फाटा ते कशेडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले असून प्रवासांचा प्रवास हा खड्डेमय रस्त्यातून होत असल्याने गणेशोत्सवापूर्वी महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी कोकणातील जन आक्रोश समितीमार्फत उपोषण मोर्चे काढण्यात आले आहे तसेच याबाबत मुंबई उच्च न्यायालय देखील जनाई याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबई व राष्ट्रीय महामार्गाची झालेले दुरावस्था पाहता या महामार्गाचे तातडीने दुरुस्ती करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह रायगड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांसमवेत या महामार्गाची चार दिवसापूर्वी पाहणी केली होती.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दुसऱ्या लेनची पाहणी केली त्यावेळेला त्यांनी दुसरा बोगदा 3 सप्टेंबर पासून गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरत करीत दिवस रात्र काम काम करून कशेडी घाटातील दुसरा बोगदा३ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदार यांना दिल्या आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याच्या दुसऱ्या मार्गिका चे काम युद्ध पातळीवर करावे असा सूचना दिल्या होत्या संबंधित अधिकारी व ठेकेदार त्यांनी ३ सप्टेंबर पर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करणार असल्याचा आश्वासन मुख्यमंत्री महोदयांना दिले मात्र आज प्रत्यक्षात जाऊन पाहणी केले असता बोगद्याचं दोन्ही साईडचे संरक्षक कठडे अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले तसेच बोगद्यामधील सिमेंट काँक्रीट रस्ता अपूर्ण अवस्थेत असल्याचा दिसून आले.
युद्ध पातळीवर काम करणार असल्याचे ठेकेदार यांनी वलग्ना केले असल्या तरी प्रत्यक्षात मात्र काम संथगतीने चालू असल्याचे दिसून आले दुसऱ्या बोगद्याच्या भोगाव गावाकडील बाजूला अजून भराव काढण्याचे काम चालू असून तेथे सध्या साईडला असलेल्या पुला जवळील रस्ता जोडल्याचे दिसून येत नाही रत्नागिरी जिल्ह्यातील खेड कडे जाणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचे काम पोपट्याच्या बाजूला असणारे गटारे अपूर्ण अवस्थेत असल्याची दिसून आले.
तसेच बोगद्यामध्ये तीन चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती असल्याचे दिसून आले तसेच दोन्ही बोगद्यांना जोडणारे रस्ते अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले याबाबत संबंधित ठेकेदाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तेथे असणारे व्यवस्थापक अमोल शिवतारे यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही तसेच अभय गिरी यांनी सुद्धा भ्रमणध्वनी उचलला नाही त्यामुळे कामाची नेमकी परिस्थिती काय आहे या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही आतापर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण पुण्याच्या अनेक तारखा दिल्या गेल्या मात्र तारीख पे तारीख जसा मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास चालू आहे तशीच काही अवस्था त्या दुसऱ्या बोगद्याची तर होणार नाही ना अशी प्रवासी वर्गाकडून प्रश्न विचारला जात आहे
प्रत्यक्षात मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आश्वासन देऊन त्या पद्धतीने काम होतानाचा दिसून येत नाही त्यामुळे अधिकारी वर्ग व ठेकेदार याबाबत किती संवेदनशील आहेत हे दिसून येत आहे याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गोसावी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र . शाखा अभियंता अमोल महाडकर यांच्याशी संपर्क साधला असता तीन तारखेपर्यंत आम्ही दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक चालू करू अशी त्यांनी माहिती दिली.
पाऊस आणि चिखलाचे साम्राज्यामुळे अॅप्रोच रोड करणे कठीण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दुसरा बोगदा 3 सप्टेंबर पूर्वी चालू करण्याचे संकेत दिले होते मात्र प्रत्यक्षात कशेडी बोगद्यात जाऊन पाहणी केली असता पोलादपूर कडून खेड कडे जाणाऱ्या अॅप्रोच रोडवर मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे त्यातच मोठ्या प्रमाणावर दिवसातून होणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे चिखलात पाणी साचून मोठ्या प्रमाणावर चिखलाच्या साम्राज्याने या अप्रत रोडचे काम घाई मध्ये केल्यास ते निकृष्ट दर्जाचे होईल असा जाणकारांच म्हणणे आहे. एकंदरीत पुढील दोन दिवसाच्या काळात कशेडी घाटातील दुसरा बोगदा चालू करणे ही राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या व संबंधित ठेकेदाराची तारेवरची कसरत असल्याचे बोलले जात आहे.