Mumbai-Goa Highway: को.ए.सो. विद्या संकुल समोर बांधण्यात आलेला पादचारी पूल म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर

को.ए.सो. विद्या संकुल समोर बांधण्यात आलेला पादचारी पूल म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर
नागोठणे ( महेंद्र माने) :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील येथील बापूसाहेब देशपांडे विद्या संकुला समोर बांधण्यात आलेला पादचारी पूल रोगापेक्षा इलाज भयंकर असा झाला असून त्यावरून ये –जा करणार्‍या विद्यार्थ्यांसह अन्य पादचार्‍यांच्या मनात धडकी भरत आहे. या पुलावर दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल नागोठणे पत्रकार संघाने उपस्थित करीत आहे.
सदरील महामार्ग तब्बल एक तप उलटल्यानंतरही मुंबई- गोवा महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असतानाच नागोठणे शहराच्या पूर्वेकडील जोगेश्वरीनगर वसाहत तसेच त्यापुढे असलेल्या डोंगरावरती साधारण पाच ते सहा आदिवासी वाड्या आहेत. तेथील सर्वच आदिवासी बांधवांना दर रोजच नोकरी,काम-धंद्यासाठी,किराणा सामान,दवाखाना व इतर दैनंदिन व्यवहारासाठी शहरामध्ये सतत ये जा करावी लागत असते.
तसेच को.ए.सो.ची अंगणवाडी, शाळा व कॉलेज आहे. तेथील निवासी वसाहत व डोंगरावरील अनेक आदिवासी वाड्यातील नागरिकांसह बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलात शिकणाऱ्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांच्या रहदारीसाठी महामार्गावर नव्याने तयार केलेला पूल हा अतिशय अरूंद असून वापरात येणारा भाग त्याहूनही कमी आहे. त्यावरून जाताना गर्दी झाल्यास चेंगराचेंगरी होऊन एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहेच शिवाय या नवीन अरुंद पूलाच्या बाजूला असलेला सरक्षण कठडा (रेलिंग) हा जेमतेम अडीच फुट उंचीचा असून त्यामध्ये असलेली गॅप ही खालची बाजू एक फुट तर वरील बाजू दीड फुटाची असल्याने तेथून लहान मुले तोल जाऊन पडण्याचा तसेच तेथे विद्यार्थ्यांमध्ये भांडण किंवा मस्ती झाल्यास तेही खाली पडण्याचा धोका हा जास्त प्रमाणात आहे.
 या धोक्यामुळे अनेक जण जुन्या मोठासलेल्या रेल्वे पूलावरून महामार्गावरील पूलावरून न जाता तेथूनच खाली येत महामार्ग रस्ता ओलांडत आहेत. यामध्येही वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने अपघात होण्याचा धोका आहे. सदरील पुलावर एखादी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल नागोठणे पत्रकार संघाने उपस्थित करीत गर्दीच्या ठिकाणी अरुंद पूल बांधून महामार्ग विभागाने विद्यार्थी व नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला असल्याने या प्रकरणाची नागोठणे पत्रकार संघाने गंभीर दखल घेतली आहे.
नागोठणे पत्रकार संघ विद्यार्थी व पालकांच्या सह्यांचे निवेदन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व स्थानिक खासदारांना देण्यात येणार असून या आंदोलनात सर्व पालक,विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी होण्याची आवाहन नागोठणे पत्रकार संघाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading