कोलाड ( श्याम लोखंडे ) :
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड कुंडलिका नदी पुलाचे रस्त्याचे काम जळगतीत सुरू झाले आहे त्यामुळे एकाच पुलावरून येणारी व जाणारी वाहतूक सुरु केल्याने या पुलावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह, पादचारी नागरिक यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असुन या पुलावर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत मुलांची सुरक्षा म्हणून वाहतूक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.
या महामार्गावर प्राथमिक मराठी शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक,तसेच पॉलिटेक्निकल कॉलेज असल्यामुळे या मार्गांवरून दररोज हजारो विद्यार्थी तसेच काही नागरीक बाजार खरेदीसाठी येजा करीत असतात.परंतु कुंडलिका नदी पात्रावरील पुलाला जोडला गेलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरनाचे काम जलदगतीत सुरू आहे त्यामुळे कोलाडकडून नागोठणे मुंबई दिशेकडे जाणारी वाहने तसेच खांब नागोठणे मुंबई कडून कोलाड इंदापूर महाड दिशेकडे येणारी वाहनांची वाहतूक ही एकाच पुलावरून सुरु असल्यामुळे या मार्गांवरून जाणारे येणारे विद्यार्थ्यांसह पादाचारी नागरिक यांना मार्ग क्रमन करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय गेली तीन चार दिवस पडत असलेल्या तुफान पावसामुळे या पुलावर पाणी साचून राहत असल्याने येणारी जाणाऱ्या वाहानंकडून त्या पाण्याचा जलाभिषेक होत आहे. त्यामुळे ठेकेदारांनी केलेले निस्कृष्ठ दर्जाचे काम आहे.कारण पाणी जाण्यासाठी ठेवलेले पाईप वर आणि रस्ता खाली यामुळे या पुलावर पाणी साचून राहत आहे. हे पाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील चौपदरी करणाचे काम १६ वर्षा पासून सुरु आहे.परंतु अद्याप ही पूर्ण झाले नाही.परंतु गणेश उत्सवाच्या नंतर या महामार्गांवरील रस्त्याचे काम मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने वेगाने सुरु केल्याचे दिसून येत आहे परंतु यामुळे या मार्गांवर विविध ठिकाणी एकाच मार्गानी येणारी जाणारी वाहतूक वळवण्यात आल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील कुंडलिका नदीवरील असणारे दोन्ही पुलाचे काम पाच सहा वर्षांपूर्वी पूर्ण झाले यामुळे या एका पुलावरून जाणारी व एका पुलावरून येणारी वाहतूक सुरु होती यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला होता.परंतु काही दिवसापूर्वी एका बाजूच्या पुलावरील वाहतूक बंद करून रस्ता खोदण्याचे काम सुरु केले आहे व ही येणारी जाणारी वाहतूक एका पुलावरून वळवण्यात आली आहे.यामुळे अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे या मार्गांवरून जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच महिसदरा नदीवरील पुलावरील परिस्थिती तशीच गंभीर आहे.
————————————————
मुंबई-गोवा महामार्गांवरील कुंडलिका व महिसदरा नदीच्या दोन्ही पुलावरून एकाच बाजुकडून येणारी जाणारी वाहतूक सुरु आहे. यामुळे अती वेगाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे बाजूनी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.यामुळे या मार्गाचे काम पुर्ण होपर्यंत विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणून शाळेच्या वेळेत या पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणप्रेमी महेशस्वामी जंगम तसेच द ग तटकरे विद्यालयाचे प्राचार्य सुखदेव तीरमले यांनी केली.