Mrs. UAE International : शितल भटनागर यांनी पटकाविला मिसेस यूएई इंटरनॅशनल 2024 चा किताब !

Bhatanagar
नवी मुंबई :
दुबईत बिइंग मुस्कान इव्हेंट्सने आयोजित मिसेस यूएई इंटरनॅशनल 2024 स्पर्धेत नवी मुंबईच्या व्यायवसायिका शितल भटनागर यांनी अव्वल स्थान मिळवत नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दुबईतील प्रतिष्ठित अशा रामी ड्रीम हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला शितल भटनागरच्या यांच्या विजयाने सर्वच स्तरांमध्ये त्यांचे कौतुक केले जात आहे.
नवी मुंबईतील श्रीमती शितल भटनागर या दागिन्यांचा व्यवसाय करत असून आपल्या कामाबरोबरच त्या शारीरीक तसेच मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील तितक्याच प्रयत्नशील असतात. भरतनाट्यमपासून ते साल्सा डान्सपर्यंय असे विविध नृत्यप्रकार त्यांना अवगत आहेत. त्याचबरोबर शारीरीक बळकटीसाठी आणि स्वसंरक्षणासाठी त्यांनी तायक्वांदोचे देखील प्रशिक्षण घेतले आहे.
मिसेस युएई इंटरनॅशनल 2024 च्या विजेत्या नवी मुंबईतील बिझनेसवुमन शितल भटनागर सांगतात की, लग्नानंतर घर आणि करिअर या दोन्हींमध्ये संतुलन राखणे स्त्रियांसाठी आव्हानात्मक ठरु शकते, कारण त्या अनेकदा घरातील कर्तव्ये, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाच्या ठिकाणी असलेला व्याप यामुळे स्वतःसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. मात्र तरीही या अडथळ्यांवर मात करुन आपली स्वप्नं पूर्ण करता आली पाहिजे. मिसेस यूएई हा मानाचा किताब जिंकण्यासाठी ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या सर्वांची मी आभारी आहे. यासारख्या स्पर्धांमध्ये, केवळ शारीरिक सौंदर्यच महत्त्वाचे नसते तर आपले व्यक्तीमत्त्व देखील तितकेच प्रभावी असणे गरजेचे असते.
शितल भटनागर पुढे सांगतात की, मिसेस यूएई इंटरनॅशनल 2024चा मुकुट मिळाल्याने तसेच अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. हा विजयाचा पल्ला गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची अधिक गरज असते. सर्वच महिलांना स्वप्नं पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा हक्क आहे फक्त त्यासाठी एक ठराविक ध्येय उराशी बाळगणे गरजेचे आहे.
बिइंग मुस्कान इव्हेंट्सविषयी
मुस्कान इव्हेंट्स ही युएईमधील आघाडीची अशा स्पर्धा आयोजन करणारी संस्था आहे. जी युएईत मिस्टर युएई इंटरनॅशनल, मिस युएई इंटरनॅशनल आणि मिसेस युएई इंटरनॅशनल यासह सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांचे आयोजन करते. मीना असरानी या बिइंग मुस्कान इव्हेंट्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
हजाराहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्यामुळे स्पर्धा अटीतटीची होती. अंतिम टप्प्यात 17 स्पर्धकांची निवड करण्यात आली. मानसी शाह (सिटी वन टुरिझम अँड ट्रॅव्हल), मनोज शेट्टी (फॅशन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव), गौतम बंगेरा (व्यवसाय उद्योजक), नेहा सिल्वा (पेजंट ग्रुमर आणि इव्हेंट्स) दर्शन शाह (एन गोपालदास ज्वेलर्स), नेहा शर्मा (अभिनेता, मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर), आणि प्रा. आदिल मतीन (वेटेल टीव्हीचे अध्यक्ष) यांचा समावेश असलेल्या ज्युरी पॅनेलसाठी निकाल आव्हानात्मक ठरला.
विशेष म्हणजे, हा कार्यक्रम शेखा फातिमा बिंथाशर बिन दालमोक अल मकतूम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता, तसेच या कार्यक्रमाला प्रतिष्ठीत मान्यवर व्यक्ती आणि दुबईतील उद्योगपती राज शेट्टी (रमीचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय कार्यकर्ता) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी एच.ई. लैला राहाल, श्रीमान अली मोहम्मद अल माझेम,  याकूब अल अली, अब्दुलअजीज अहमद, हरज्योत ओबेरॉय बोहरा, झुबेर सारूख, गौरी सिंग, सादिक अहमद, डॉ. मिर्ना युनेस, रोमेन गेरार्डिन-फ्रेस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading