MIDC मधील हेलिपॅडची जागा खाजगी कंपनीला विकली; महाडमध्ये आपत्कालीन स्थितीत हेलिकॉप्टर उतरणार कुठे..?

Halipad
महाड ( मिलिंद माने ) :
महाड औद्योगिक वसाहतीमधील अस्तित्वात असलेले हेलिपॅड नव्याने उभ्या राहिलेल्या एका कंपनीला विकले गेले. यामुळे गेली कांही वर्षापासून याठिकाणी खाजगी जागेत हेलिकॉप्टर उतरवावे लागत आहे. शेतजमीन किंवा पडीक जागेत लाखो रुपये खर्च केले जात आहेत. काल झालेल्या हेलिकॉप्टर अपघातानंतर कायमस्वरूपी हेलिकॉप्टरची गरज निर्माण झाली आहे.
महाड हि ऐतिहासिक भूमी आहे. किल्ले रायगड, महाड, शिवथरघळ, शेजारील गांधारपाले बौद्ध लेण्या, अशी अनेक ऐतिहासिक स्थळे महाडमध्ये आहेत. महाड तसेच किल्ले रायगडावर प्रातीवर्षी लाखो पर्यटक, भीमसैनिक, शिवसैनिक उपस्थित राहतात. विविध महत्वपूर्ण कार्यक्रमाना देशातील दिग्गज आणि मान्यवर व्यक्ती उपस्थित राहतात. कांही वर्षापूर्वी रायगडावर येणारे दिग्गज मान्यवर गडावर हेलिकॉप्टर ने येत होते. गडावर होळीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरण्यास विरोध झाला. यामुळे गडावर हेलिकॉप्टर उतरवणे बंद कारण्यात आले. त्यानंतर पायथ्याशी पाचाड येथे तात्पुरत्या स्वरूपात हेलिपॅड तयार करून लाखो रुपयांचा चुराडा करण्यास सुरवात केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे हेलिपॅड तयार केले जात आहेत. महाड हि मुळातच ऐतिहासिक भूमी असल्याने जागतिक पातळीवर नोंद झालेले चवदार तळे येथे देखील लाखो भीमसैनिक येत असतात. यावेळी देखील विविध कार्यक्रमाना मंत्री, दिग्गज नेते, हजेरी लावत असतात.
महाड शहरात पूरपरिस्थिती उद्भवत असल्याने देखील कायम चर्चेत राहिले आहे. शहरातील पूर येण्याची पार्श्वभूमी पाहता गेली अनेक वर्षात मोठी हानी झाली आहे. अशा आपत्कालीन स्थितीत देखील दिग्गज नेते, मदतीला येणारे एन.डी.आर.एफ.ची पथके, दाखल होतात. महाड शहर आणि परिसरात गेली अनेक वर्षात विविध दुर्घटना घडून नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास हेलिकॉप्टर उतरवायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. महाड परिसरात असलेल्या या घटनांचा आढावा घेतला असता तालुक्यात कायमस्वरूपी हेलिपॅड ची गरज निर्माण झाली आहे. महाड जवळ मुंबई गोवा महामार्गालगत मोहोप्रे आदिवासी वाडी जवळ नव्याने एक जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी अद्याप कोणतेच काम सुरु झालेले नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग गेली अनेक वर्षात खाजगी जागेत हेलिपॅड तयार करून लाखो रुपयांचा चुराडा करत आहेत.
महाड औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र उभे राहणार होते. याकरिता जागा भूसंपादन करून प्लॉट देखील पाडण्यात आले. एकूण १०० हेक्टरवर हे पंचतारांकित औद्योगिक उभे राहिले आहे. २३.९३ हेक्टर यामध्ये जवळपास २४ प्लॉट पाडण्यात आले. याचबरोबर भूमिगत विद्युत व्यवस्था, पदपथ, हेलिपॅड, दूरध्वनी, पाणीपुरवठा योजना, पोलीस चौकी, आदी कामांचा आणि सुविधांचा यामध्ये समावेश होता. या क्षेत्राकरिता सन १९९९ पर्यंत जवळपास १३३२.४६ लक्ष खर्च करण्यात आला. हे हेलिपॅड गेली अनेक वर्ष वापरात आले. मात्र पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात शासनाने स्वारस्य न दाखवल्याने हे क्षेत्र ओसाडच राहिले आहे. यामुळे पंचतारांकितचा दर्जा शासनाने काढून टाकल. यामुळे कांही महिन्यापूर्वी हे हेलिपॅड देखील या परिसरात येणाऱ्या एका कंपनीला विकण्यात आले आहे. महाड आमशेत गावानजीक हे हेलिपॅड आहे. याच ठिकाणी ओरिएन्ट अॅरोमॅटीक अॅन्ड सन्स लिमिटेड या कंपनीचे काम सुरु आहे. जी जागा कंपनीने घेतली आहे त्या जागेतच हेलिपॅड बांधण्यात आले होते. या हेलिपॅड चा वापर ज्या ज्या वेळी महाड आपत्कालीन स्थिती उद्भवली त्या त्या वेळेस वापर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते याच हेलिपॅड वर उतरले आहेत. महाड एम.आय.डी.सी.ने देखील अद्याप औद्योगिक क्षेत्रात नव्याने हेलिपॅड उभे केलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading