महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त आज माथेरानमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माथेरान (matheran) मधील इंग्रजी माध्यमांची सेंट झेवियर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती वर पथ नाट्य सादर करून उपस्थित नागरिकांची मने जिंकली.
आज महाराष्ट्र दिनानिमित्त येथील नगरपरिषद प्रांगणामध्ये माथेरानचे मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक राहुल इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर येथील श्रीराम चौक येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर मराठीमध्ये पथनाट्य सादर करून सर्वांची व्हावा म्हणून या पथनाट्यानंतर या शाळेच्या विद्यार्थ्या मी लेझीम चे विविध प्रकार खेळत नागरिकांचे मनोरंजन गेले.
यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेसिलिया परेरा यांनी माथेरानमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेवर चिंता व्यक्त करताना तरुण पिढीला व्यसनापसून मुक्त करण्याकरताच शाळेने हा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शाळेतील शिक्षकांचेही कौतुक करताना एक सुंदर कार्यक्रम बसवल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी माथेरानचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, कुलदीप जाधव, राजेश दळवी, सुनील शिंदे सेंट झेवियर चे सर्व शिक्षक वर्ग व असंख्य नागरीक व पालक यावेळी उपस्थित होते.