माथेरान मधील होतकरु तरुणांसाठी असो किंवा आबालवृद्ध मंडळींना अभिप्रेत काही सर्वंकष कामे असोत, शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य त्याचप्रमाणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न करून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच अग्रेसर दिसत आहेत.
वाढत्या महागाई मध्ये दरवर्षी बेरोजगार युवकांची संख्या वाढत चालली आहे. युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होत नसल्याने तरुण पिढी व्यसनाधीन होत असून अल्पायुष्यात कुटुंबातील सदस्यांचे आधार उध्वस्त झालेले आहेत.
काही राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने सद्यस्थितीत मुख्य प्रवेशद्वारापासून जागोजागी स्टोल्स लावण्यात आल्याने गावाला एकप्रकारे विद्रुपीकरण प्राप्त झाले आहे.
सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हवी यासाठी भरघोस उत्पन्न मिळवून देणारे एकमेव साधन म्हणजे अर्थातच व्हॅली क्रॉसिंग हाच व्यवसाय असल्याने याच साहसी खेळांच्या माध्यमातून मागील काळात अनेक जणांना याचा मोठया प्रमाणावर आर्थिक लाभ घेता आला होता.
विशेष म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती चोहोबाजूंनी उत्तम आहे. अशीच काहीशी मंडळी व्हॅली क्रॉसिंग व्यवसायात पर्यटकांना उत्तम सुविधा देत होते. आणि या साहसी खेळांच्या आकर्षणामुळेच याठिकाणी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. परंतु व्हॅली क्रॉसिंगचे रोप झाडांना लावले जात असल्याने झाडे कमकुवत झाली होती. काही प्रमाणात या खेळाला विरोध झाल्याने वनखात्याने काही वर्षांपूर्वी हे साहसी खेळ बंद केले होते.
परंतु ज्यांना उत्पनाचे काहीही साधन नाही अशाच युवकांना ह्याच एकमेव व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी यासाठी माथेरान भाजपच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. नुकताच केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तरपणे चर्चा केली होती,
यावेळी भाजप अध्यक्ष प्रवीण सकपाळ, उपाध्यक्ष किरण चौधरी, व्यापारी संघटना अध्यक्ष राजेश चौधरी, माजी उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगरसेवक प्रदीप घावरे हे उपस्थित होते. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांच्याशी अगोदरच याबाबत चर्चा करण्यात आली होती.याकामी वन विभागाने परवानगी दिल्यास हा साहसी खेळ पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू होण्याची शक्यता असून यामध्ये जे खरोखरच गरजवंत आहेत ज्यांना उत्पनाचे साधन नाही अशांना यात समाविष्ट करण्यात येणार असल्याने युवा वर्गाला सुगीचे दिवस येणार आहेत त्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
———————————————
माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी या प्रेक्षणीय स्थळा व्यतिरिक्त मनोरंजनाचे अन्य साधन नाही त्यामुळे साहसी क्रीडा प्रकार (व्हॅली क्रॉसिंग) सुरु झाल्यास येथील पर्यटन व्यवसायात निश्चित भर पडू शकते आणि विशेषतः गरजू स्थानिक तरुणांना यामध्ये संधी मिळाल्यास येथील स्थानिक तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते त्याचप्रमाणे नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्यास मदत होऊ शकते त्यामुळे माथेरान भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी वैशिष्टपूर्ण उपक्रमा सुरु व्हावा यासाठी प्रयत्नात आहोत.
…चंद्रकांत जाधव, माजी उप नगराध्यक्ष माथेरान
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.