माथेरान मधील महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून नावारूपाला आलेल्या आकाशगंगा प्रकल्पाला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. करोडो रुपये खर्चून बनविलेला प्रकल्प हा लॉकडाऊनच्या आधी पासुन बंद आहे.
माथेरान मधील पर्यटकांचे ज्या प्रमाणे ३८ पॉईंट हे आकर्षण आहे. त्याप्रमाणे आकाशगंगा देखील खगोल शास्त्रातील अभ्यासा करीता पर्यटकांसाठी व शाळेय विद्यार्थ्यांसाठी अति महत्वाचा प्रकल्प असल्याने व माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेचा अर्थिक स्त्रोत असल्यामुळे हा प्रकल्प बंद अवस्थेत असल्यामुळे यावर खर्च केलेला कोट्यावधीचा निधी पाण्यात गेला का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनकडून उपस्थित होत असल्याने, बंद पडलेला आकाशगंगा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी माथेरान भारतीय जनता पार्टीचे उप शहर अध्यक्ष सुभाष भोसले यांनी माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेला लेखी निवेदन दिले आहे.
माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. प्रदूषण मुक्त म्हणून माथेरानची ख्याती सर्वदूर पसरली आहे. माथेरान मधील असलेल्या ३८ पॉईंट खेरीज पर्यटकांना वेगळा विरंगुळा मिळावा व त्या विरंगुळ्यातून अभ्यास शिकता यावा या उद्देशाने आकाशातील सूर्य, चंद्र, ग्रह, तारे याची माहिती सर्वसामान्य लोकांना फक्त पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान व माहिती ही माथेरानमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला प्रत्यक्षात दुर्बिणीच्या माध्यमातून अनुभवता यावी म्हणून माथेरान गिरीस्थान नगरपरिषद निर्मित कोटयावधीचा निधी खर्च करून आकाशगंगा अवकाश निरीक्षण केंद्र बांधण्यात आले होते.
यामध्ये आकाशातील तारे, ग्रह, धूमकेतू, उल्का अवकाशात होणारे बदल याविषयी माहिती दिली जायची व नंतर वातानुकूलित सिनेमागृहात बसून थ्री डी खगोलीय माहितीपट पहावयास मिळत होता. तर टेरेसवर मोठमोठ्या टेलिस्कोप मधून अवकाशातील तारे ,ग्रह तसेच इतर ही पहावयास मिळत होते. प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांच्या अथक प्रयत्नातून हा प्रकल्प तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या कालावधीत उभा राहिला होता. येथे भेट द्यायला आलेल्या पर्यटकांनी खगोलीय बदल अनुभवले असुन, त्यावेळचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी त्यांच्या परिवारासह उल्कापातीचा थरार येथूनच अनुभवला होता.
मात्र जनतेच्या कररूपी पैशातून शासनाच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी खर्च करून बांधण्यात आलेला हा प्रकल्प लॉकडाऊनच्या आधी पासुन धूळ खात बंद अवस्थेत पडला आहे. सुरक्षा कठडे, रेलिंग यांना गंज लागून ते तुटण्याच्या अवस्थेत आहेत. तर प्रवेशद्वार कुलुपासह गंजून गेले आहे. सिनेमगृहाचे दरवाजे अवस्थेत असुन, सिनेमागृहात उंदराचे साम्राज्य दिसून येत आहेत. तसेच अनेक महागडी इलेक्ट्रिनिक उपकरण धूळ खात आवस्थेत पडलेली आहेत. त्यामुळे ती सुरू की बंद हे मात्र राम भरोसे आहे.
मोठमोठ्या दुर्बिणी या निपचित पडलेल्या आवस्थेत आहेत. मात्र याकडे माथेरान गिरिस्थान नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. बंद प्रकल्पाकडे जाणाऱ्या मार्ग दर्शविणारे सुचना फळक लावण्यास मात्र माथेरान गिरिस्थान नगरपालिकेला विसर पडला नसुन बंद प्रकल्पसुरू करण्याचा विसर हा माथेरान गिरिस्थान नगरपालिकेला पडला असल्याने, आकाशातील सूर्य, चंद्र, ग्रह, तारे याची माहिती ही माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटक व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकरिता महत्त्वपूर्ण असल्याने, व माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या आर्थिक स्त्रोत असलेला बंद अवस्थेत असलेला आकाशगंगा अवकाश केंद्र प्रकल्प सुरू करण्यासाठी माथेरान भारतीय जनता पार्टीचे उपशहर अध्यक्ष सुभाष भोसले यांनी लेखी निवेदन हे माथेरान गिरिस्थान नगर परिषदेला दिले आहे.
——————————————
हा आकाशगंगा प्रकल्प सुरू झाल्यापासून माथेरान मधील पर्यटन वाढले होते पर्यटक या प्रकल्पाला अवश्य भेट देत होते. खगोलीय अभ्यासक सुद्धा माथेरानमध्ये येत होते. पण तीन वर्षांपासून हा प्रकल्प बंद असल्यामुळे काही प्रमाणात खगोल अभ्यासक येथे येण बंद झाले आहेत. मात्र माथेरान नगरपरिषदेला याचं काही सोयरसुतक पडल्याचे दिसत असल्याने, व पर्यटनवाढीसाठी हा प्रकल्प सुरू होणे गरजेचे असल्यामुळे हे निवेदन दिले असुन, सदर प्रकल्प सुरू करण्यास माथेरान नगरपरिषदेकडून दिरंगाई झाल्यास भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू.
……सुभाष भोसले, माथेरान उपशहर अध्यक्ष, भाजपा.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.