जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेले माथेरान या ठिकाणी शनिवार दि.4 रोजी या वीकेंडची सुट्टी असल्याने मुंबई( मुलुंड ) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुनील शिवराम डोईफोडे यांनी MH03DX4992 पासिंग असलेली किया कंपनीच्या आपल्या मालकीच्या वाहनाने चालकासह कुटुंबाला घेऊन माथेरान फिरण्यासाठी आले होते.
मालक सुनील डोईफोडे यांना माथेरानला सोडून पुन्हा दस्तुरी येथील वाहन तळावरून मध्य धुंद अवस्थेत असलेला वाहन चालक मोहनेश शीतुरकर आपल्या किया कंपनीच्या वाहनाने परतीचा प्रवास करत असताना वनविभागाच्या वाहनतळावर उभ्या असलेल्या प्रवासी घोड्यांपैकी एका घोड्याला धडक दिली यानंतर वाहन तळावर उभ्या असलेल्या वाहनांपैकी केरळ येथील KA 03NR 5952 पासिंग असलेली ऑलट्रॉक व तिच्या शेजारील दोन वाहनांना तसेच MH 02 EK1448 पासिंग असलेल्या बलेनो या वाहनाला धडक देऊन दस्तुरी नाका येथील प्रवेशद्वारावरून आपले वाहन अति वेगात पळवत माथेरान- नेरळ घाट मार्गातील गारबट रस्त्याजवळ आपल्या वाहनाचा देखील सुरक्षा कट्टाड्यांवर आधळून अपघात केला व तेथून धूम ठोकली.
यावेळी या घटनेची माहिती मिळताच नेरळ व माथेरान पोलिसांनी नेरळ – माथेरान घाटातील गारबट रस्ता येथील घटनास्थळावर धाव घेत संपूर्ण प्रकाराची पाहणी केली व अपघात ग्रस्त वाहन या घाटातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या मार्गात अडथळा होऊ नये सदर वाहन बाजूला केले व पळ काढणाऱ्या वाहन चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन चालकाने अंधाराचा फायदा घेत लपून बसल्यामुळे तो वाहन चालक पोलिसांच्या हाती लागला नाही मात्र पोलीस तसेच वन विभागाचे काही कर्मचारी या वाहन चालकाचा शोध घेत असताना वाहन चालक मोहनेश शितुरकर हा कड्यावरचा गणपती या नेरळ- माथेरान मिनी ट्रेनच्या रेल्वे ट्रॅक जवळ लपून बसल्याचे आढळले असता वन विभागाचे शिपाई व कर्मचारी यांनी या वाहन चालकाला ताब्यात घेऊन माथेरान पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.