१९२-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्येअलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यातील पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ४६१ व दिव्यांग मतदार २७ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी १२ ड अर्ज दिले आहेत. तर १९०-उरण विधानसभा मतदार संघामध्येपोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ६८ व दिव्यांग मतदार १६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी १२ ड अर्ज दिले आहेत.
त्यानुसार १९२-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये आणि १९०-उरण विधानसभा मतदार संघामध्ये शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी दिव्यांग व ज्येष्ठांचे गृहमतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी १९२-अलिबाग विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण तर १९०-उरण विधानसभा मतदार संघ जनार्दन कासार दिली आहे.
अलिबागमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण व उरणमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण मतदारसंघात शुक्रवार,दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी यासाठी अलिबागमध्ये गृहमतदानाकरिता ३७ पथके कार्यरत असणार आहेत तर उरणमध्ये गृहमतदानाकरिता ७ पथके कार्यरत असणार आहेत ही मतदान प्रक्रिया एक दिवस सुरू राहणार आहे.
अलिबाग मतदारसंघामध्ये ८५+वर्षांवरील ४६१ व दिव्यांग २७ मतदार अशा एकूण ४८८ मतदारांची गृहमतदानासाठी नोंदणी करण्यात आली आहे. शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी घरोघरी जाऊन मतदान केंद्राची उभारणी करूनटपाली मतदान घेतले जाणार आहे
उरण मतदारसंघामध्ये ८५ वर्षांवरील ६८ व दिव्यांग १६ मतदार अशा एकूण ८४ मतदारांची गृहमतदानासाठी नोंदणी करण्यात आली आहे. शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी घरोघरी जाऊन मतदान केंद्राची उभारणी करूनटपाली मतदान घेतले जाणार आहे
येत्या २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूकीत मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, मतदानासाठी नागरिकांमध्ये जागरुकता यावी, म्हणून मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाचे पवित्र कार्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.