Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात दुपारपर्यंत कुठे आणि किती टक्के मतदान

Voting Mahila
मुंबई :
महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यात सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
सध्या निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा ठिकठिकाणी सज्ज आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कुठे कितीमतदानझाले, याची आकडेवारीही समोर आली आहे. निवडणूक आयोगाने ही आकडेवारी सतत अपडेट होत आहे.
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. 
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:
  • अहमदनगर – ३२.९० टक्के,
  • अकोला – २९.८७ टक्के,
  • अमरावती – ३१.३२ टक्के,
  • औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
  • बीड – ३२.५८ टक्के,
  • भंडारा- ३५.०६ टक्के,
  • बुलढाणा- ३२.९१ टक्के,
  • चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
  • धुळे – ३४.०५ टक्के,
  • गडचिरोली-५०.८९ टक्के,
  • गोंदिया – ४०.४६ टक्के,
  • हिंगोली -३५.९७ टक्के,
  • जळगाव – २७.८८ टक्के,
  • जालना- ३६.४२ टक्के,
  • कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
  • लातूर _ ३३.२७ टक्के,
  • मुंबई शहर- २७.७३ टक्के,
  • मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
  • नागपूर – ३१.६५ टक्के,
  • नांदेड – २८.१५ टक्के,
  • नंदुरबार- ३७.४० टक्के,
  • नाशिक – ३२.३० टक्के,
  • उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
  • पालघर-३३.४० टक्के,
  • परभणी-३३.१२टक्के,
  • पुणे – २९.०३ टक्के,
  • रायगड – ३४.८४ टक्के,
  • रत्नागिरी-३८.५२ टक्के,
  • सांगली – ३३.५० टक्के,
  • सातारा -३४.७८ टक्के,
  • सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के,
  • सोलापूर – २९.४४,
  • ठाणे -२८.३५ टक्के,
  • वर्धा – ३४.५५ टक्के,
  • वाशिम – २९.३१ टक्के,
  • यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading