Maharashtra Assembly Election 2024 : आज पेण, अलिबाग, महाड आणि उरण मतदारसंघात अर्ज दाखल; जाणून घ्या नावं

Voting
अलिबाग :
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास दि.22 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघा पैकी अलिबाग, महाड, पेण आणि उरण मतदारसंघात सहा उमेदवारांची नामनिर्देशनपत्र दाखल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
194-महाड विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 1 नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. भरत मारुती गोगावले (शिवसेना).
192-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये आज 3 उमेदवारांची 3 नामनिर्देशन पत्र सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1) चित्रलेखा नृपाल पाटील (शेतकरी कामगार पक्ष), 2) सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), 3) सुप्रिया जयंत पाटील (शेतकरी कामगार पक्ष).
191-पेण विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 1 नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. रविंद्र दगडू पाटील, (भारतीय जनता पार्टी).
190-उरण विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 1 नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. कुंदन घरत (अपक्ष).
उमेदवारी अर्ज घेवून गेलेल्यांची मतदार संघ निहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.
188-पनवेल 29 अर्ज,
189-कर्जत 5 अर्ज,
190-उरण 3 अर्ज,
192-अलिबाग 5,
194-महाड 5 अर्ज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading