महत्त्वाचं म्हणजे अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निलेश लंके अजित पवार गटातून शरद पवारांकडे स्वगृही परतले असून, शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिला.
मुंबईत शरद पवार गटाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये एकूण 5 उमेदवारांचा समावेश करण्यात आला.
उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे –
वर्धा – अमर काळे
दिंडोरी – भास्कर भगरे
बारामती – सुप्रिया सुळे
शिरुर – अमोल कोल्हे
अहमदनगर – निलेश लंके