कर्जत ग्रामीण ( मोतीराम पादीर ) :
कर्जत तालुक्यात रोज अपघाती घटना घडत असतातच आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सुगवे पिंगळेवाडी येथील वळणावर टुव्हिलर व कंन्टेनर यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे.
सुगवे पिंगळेवाडी पुढील वळणावर टुव्हिलर MH46CJ6942 या नंबरची गाडी रोहीदास नारायन कांबडी (२७ वर्षे) राहणार एकनाथवाडी हा सराईवाडी सासुरवाडीला गेला होता. सकाळी सुगवे येथील सलून मधून केश कापून घरी एकनाथवाडीला जात असताना पिंगळे वाडी वळणावर सकाळी साडे नऊच्या दरम्यान कंन्टेनर MH43CK1775 हा कंन्टेनर भरधाव वेगाने कर्जतच्या दिशेने येत होता.
यावेळी समोरासमोर ट्रव्हिलरची धडक झाली त्यात रोहिदास कांबडी रस्त्यावर पडून रस्त्याच्या बाजूला फेकला गेला त्याचे रक्तस्राव जास्त झाल्याने त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय कशेळे येथे दाखल केले. टूव्हिलर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कन्टेनरचे कुठेच नुकसान होताना दिसले नाही. रोहिदास कांबडी यांना डॉक्टरांनी तपासणी केली असता रोहीदास कांबडी यांची तब्येत बरी असून पायाला व हाताला जबर मार लागला आहे तसेच एका कानातून रक्त येत आहे.असे डॉक्टरांना तपासणीत दिसून आले आहे.
डॉक्टरांनी तात्काळ रोहीदास कांबडी यांना पनवेल MGM दवाखान्यात पुढे पाठवण्यात आले.पुढील तपास कशेळे पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल लालासाहेब थोरने पोलीस हवालदार,राहूल जाधव करत आहेत.
अजून कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसून MGM दवाखान्याचा रिपोर्ट येईल त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे हेड कॉन्स्टेबल लालासाहेब थोरने यांच्या कडून सांगण्यात आले आहे. पुढील तपास लागताच कळविण्यात येईल.