Karjat : दफन भूमी प्रश्न पेटणार

Karjat Adivasee Samaj
कर्जत ग्रामीण (मोतीराम पादीर ) : 
सालोख ग्रामपंचायत हद्दीतील नारळाचीवाडी येथील आदिवासी समाजाच्या जागेवरील दफन स्मशानभूमीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने जेसीबीच्या साह्याने येथील जमिन साफ करून मृतदेहांची अवहेलना केल्याने येथील समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान आता दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असताना कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेकडून सबंधिष दोषींवर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
 कर्जत तालुक्यातील सालोख येथील रहिवाशी असलेले ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या व्यक्तीने गावाला लागून असणाऱ्या नारळाचीवाडी येथील आदिवासी समाजाच्या मालकीच्या जागेवर जेसीबीच्या साह्याने जागा खोदून ती साफ केली. या जागेवरील झाडे देखील तोडण्यात आली आहेत. जागा साफ करीत असताना या जागेवरील दफन भूमीतील मृतदेहांची विटंबना करण्यात येवून मृतदेहाचे अवशेष उघड्यावर टाकले आहेत. त्यामुळे येथील जागा मालक बुधाजी पदू थोराड यांनी व नागरिकांनी यावर आक्षेप घेतला. विनापरवाना जागेवर अतिक्रमण त्याच बरोबर आदिवासी ठाकूर सामजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी तहसीलदार, सरपंच, तलाठी मंडळ अधिकारी तर वनविभागाला देखील याबाबत कळविले आहे.
मात्र यावर ठोस उपाय निघत नसून अधिकारी हे प्रकरण दाबण्याचा तयारीत असल्याने. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेने या प्रकरणात उडी घेत सबंधिष दोषींवर कारवाईसाठी नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांना लेखी निवेदन आज देण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरोडा यांनी अधिकारी ढवळे यांना ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला व सबंधित व्यक्तीवर अनुसूचित जाती  जमाती 1989 कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यावे म्हणून मागणी केलेली आहे. यावेळी जागा मालकासह आदिवासी समाज मोठ्या संख्येने नेरळ पोलीस ठाण्यात उपस्थीत होता.
 सदर जागा आदिवासी समाजाची असताना ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला यांनी ही जागा आदिवासी समाजाची माहित असताना जागेत कोणाच्या सांगण्यावरून जेसीबी चढवला म्हणून प्रश्न करण्यात आला. शिवाय ही जागा मुंबई स्थित धनिकला विकल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा दोषींवर महसूल विभाग अधिकारी,पोलीस प्रशासन काय कारवाई करतात म्हणून पाहणे महत्वाचे असणार आहे. विकण्यात आलेली जागा ही शासनाच्या देखभालितील असल्याने ती st समजासाठी कसण्यासाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे परस्पर जागेचा खरेदी विक्री करणाऱ्या वर देखील कारवाई व्हावी म्हणून मागणी पुढे येत असून हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading