Karjat : कळंब बीटाच्या क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा उत्साहात संपन्न

Kho Kho
कर्जत ग्रामीण ( मोतीराम पादिर ) :            
 मंगळवार दि.10 डिसेंबर रोजी रायगड जिल्हा परिषद,अलिबाग सेस फंड अंतर्गत या वर्षीच्या क्रीडा व व्यक्तिमत्व विकास बीटस्तरीय स्पर्धांचे आयोजन रायगड जिल्हा परिषद शाळा कळंब येथे करण्यात आले.कळंब बीट अंतर्गत वारे,खांडस, नांदगाव,कळंब व दहिवली माले या पाच केंद्रातील केंद्रस्तरावरील विजेते संघ स्पर्धेसाठी आलेले असल्याने क्रीडा सामने व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये चांगलीच चुरस पहावयास मिळाली.
यावर्षी मुलांसाठी लगोरी व बेचकीने नेम धरणे आणि मुलींसाठी लंगडी व दोरी उड्या असे क्रीडा प्रकार जिल्हा परिषदे कडून ठरविण्यात आले होते.मागील काही वर्षात दुर्लक्षित राहिलेल्या या पारंपारिक क्रीडा प्रकारांना पुन्हा नव्याने चालना मिळाली आहे.
 सांस्कृतिक स्पर्धा अंतर्गत समूहगीत गायन, समूहनृत्य व पथनाट्य या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. दिवसभर शाळेत उत्साह व जल्लोषमय वातावरण होते.कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांनी विद्यार्थ्यांना व स्पर्धांकांना शुभेच्छा दिल्या.तसेच केंद्रप्रमुख सौ.माधुरी पाटील,पी.एस.म्हात्रे अंकुश करपे यांच्या निरीक्षण व देखरेखी खाली स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या.
     *कळंब बीटस्तर बेचकिने नेम धरणे निकाल.*
*लहान गट* 
प्रथम क्रमांक-पंकज चंद्रकांत पारधी केंद्र वारे 
द्वितीय क्रमांक- विकी संतोष निरगुडा केंद्र कळंब 
तृतीय क्रमांक- आर्यन रमेश पिरकड केंद्र खांडस 
*मोठा गट*
प्रथम क्रमांक- आकाश काशिनाथ पादिर केंद्र नांदगाव 
द्वितीय क्रमांक – रोहन मधुकर दुबेला केंद्र कळंब 
तृतीय क्रमांक-दर्शन जनार्दन पातोरे केंद्रात दहिवली महाले.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading