Karjat : एक नंबरचं बटण दाबा सांगणार्‍या अधिकार्‍याची उचल बांगडी, काही काळ मात्र तणावाचं वातावरण

Karjat Voting
कर्जत ( गणेश पवार ) : 
राज्यात विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून कर्जत विधानसभा मतदारसंघात मोठमोठी राजकीय स्थित्यंतरे घडत राहिली. कधी सबंध पक्षाचा राजीनामा, तर कधी पक्षांतर अशी राजकीय नाट्य घडत कर्जत मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अशात आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदानावेळी सर्वत्र मतदान सुरळीत सुरू असताना बीड मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याची घटना घडली आहे.
कर्जत तालुक्यातील बीड बूथ क्रमांक २२९ मध्ये सकाळी मतदान सुरळीत सुरू होते. अशात तेथील मतदान अधिकारी यांनी काही ज्येष्ठ मतदारांना प्रथम क्रमांकाचे बटण दाबण्यास सांगत असल्याची तक्रार उपस्थित मतदारांनी केली. यावरून वाद होऊन काही काळ येथील वातावरण तापले होते. तर बातमी समजताच अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचे वडील हे देखील बुथवर उपस्थित झाले.
संबंधित प्रकार पाहून ते देखील आक्रमक झाले. दरम्यान हे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकारी यांना समजल्यावर त्यांनी क्षेत्रीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांना बीड येथे बुथवर पाठवले. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी सबंधित अधिकाऱ्याची तत्काळ उचलबांगडी करत नवीन अधिकारी नियुक्त केल्याने हा वाद निवळला मात्र या मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
—————————————————-
आज मी मतदानासाठी आजोबांसह गेलो होतो. आजोबा वयस्क असल्याने बुथवरील मतदान अधिकारी यांनी आजोबांना मदत करताना त्यांना १ नंबरच बटण दाबा असं सांगितल्याच मी ऐकलं. तसच याअगोदर देखील जे ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी गेले होते त्यांना ते १ क्रमांकाचं बटन दाबण्यास सांगत होते. हा प्रकार लोकशाहीला डाग लावणारा असल्याने आम्ही तात्काळ याबाबत आवाज उठवून संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली. तर यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी यांनी देखील आम्हास सहकार्य केली नसल्याची खंत आम्हाला आहे.
… रोशन रुठे, प्रत्यक्षदर्शी
—————————————————-
संबंधित प्रकार बूथ क्रमांक २२९ येथे घडला होता. याबाबत मला माहिती मिळाल्यावर मी झोनल अधिकारी, पोलीस अधिकारी याना तात्काळ संबंधित बुथवर पाठवून परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले. तसे तिथे मतदान केंद्र अधिकारी यांच्याबाबत मतदारांचा काहीतरी गैरसमज झाल्याचे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही संबंधित मतदान केंद्र अधिकारी यांना तिथून हलवून नवीन अधिकारी नियुक्त केला. बाकी तिथे मतदान सुरळीत पार पडले.
…प्रशांत संकपाळ, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading