कर्जत तालुक्यातील भिवपूरी रेल्वे स्थानका शेजारील भिवपूरी कडून कर्जत रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गा लगत पार्किंग केलेल्या दुचाकी या परिसरात गवताला लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना आज दि. २९ मार्च रोजी दुपारचे सुमारास घडली आहे.
भिवपूरी रेल्वे स्थानकातील जाणाऱ्या चिंचवली गावा लगत भिवपूरी रेल्वे स्थानकांतून कर्जत रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाला लागून चिंचवली गावा लगत तसेच बार्डी गावाकडे जाणारा मार्ग व रेल्वे रुळा दरम्यान असलेले मोकळ्या जागेत तसेच भिवपूरी रेल्वे स्थानक ते नेरळ रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या बाजूस डिकसळ गावा जवळील रेल्वे रूळा लगत सकाळी मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर आशा इतर ठिकाणी कामाला जाणाऱ्या लोकांकडून आपली दुचाकी वाहाने ही मोठया प्रमाणात पार्कींग केली जातात.
शनिवार दि. २९ मार्च रोजी सकाळचे सुमारास कामाला गेलेल्या सहा व्यक्तींनी आपली दुचाकी वाहाने ही भिवपूरी रेल्वे स्थानकांतून कर्जत रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाला लागून बार्डी गावाकडे जाणारा असलेला मार्ग व रेल्वे रुळा दरम्यान असलेल्या बोरीच्या झाडाखाली असलेल्या गवताचे भागात पार्कींग केल्या होत्या मात्र दुपारचे १.३० ते २.०० वाजण्याचे सुमारास वाढते तापमान पाहाता व गवताला लागललेली आग व गवत सुकलेले व उन्हात तापले असल्याने गवताने मोठ्या प्रमाणात पेट घेतला असल्याने सदर आग ही बोरीच्या झाडाखाली असलेल्या गवताचे भागात पार्कींग केलेल्या सहा दुचाकी वाहानांपर्यंत पोहचल्याने या आगीत पार्कींग केलेली सहा दुचाकी वाहने मात्र पूर्ण पणे जळून खाक झाली आहे.
सदर आग लागली की लावली गेली? असा प्रश्न मात्र नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तर या आगीत भस्म झालेल्या दुचाकी वाहनांमध्ये दोन फॅशन, एक फ्रीडम असल्याचा अंदाज तर एक गाडी कोणत्या कंपनीची असल्याचा अंदाज येत नाही. तर एक एक्टिवा कंपनी व स्कुटी असल्याचे समोर येत आहे. तर या लागलेल्या की लावलेल्या आगीत मात्र दुचाकी वाहन धारकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तर ही आग लागली की लावली? असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याने या जळीतकांडाची उकळ रेल्वे व शहर पोलीस कशा पध्दीती करणार या कडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.