HMPV हा चीनमध्ये पसरलेला ह्यूमन मेटा प्युमो व्हायरस संसर्ग भारतात पोचला असून बंगलोर मध्ये एका आठ महिन्याच्या मुलीला याची लागण झाली आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील याची लागण होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या उद्याच्या साप्ताहिक बैठकीत राज्यात आरोग्य विभागाला दर प्राण्याच्या सूचना देण्याबरोबरच पुन्हा एकदा मास्क वापरण्याच्या सूचनांबरोबर गर्दी कमी करण्यासाठी काही उपाययोजना आखण्याची शक्यता राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या साप्ताहिक बैठकीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चीनमध्ये ह्यूमन मेटो प्युमो व्हायरस H M PV या रोगाचा उद्रेक झाला असून या विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव गेल्याचे वृत्त आहे भारतात ही आरोग्य मंत्रालयाने याबाबत क** उपाययोजना चालू केली आहे अनेक राज्यांनी अलर्ट आणि अलर्ट जारी केले आहेत यासह भारतात देखील एच एम पी व्ही विषाणू चे पहिले प्रकरण कर्नाटक मध्ये समोर आले आहे.
कर्नाटकातील बंगलोर मधील हॉस्पिटलमध्ये आठ महिन्याच्या मुलींमध्ये HM P V व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत मात्र एका खाजगी प्रयोगशाळेत मुलीला संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे कर्नाटक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की त्यांच्या प्रयोगशाळेत नमुन्याची चाचणी झाली नाही एका खाजगी रुग्णालयाच्या अहवालाची बाब समोर आली आहे ट्रेन बाबत कोणतीही माहिती नाही नमुने शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत सरकारने व्हायरस बाबत अलर्ट जारी केला आहे व दक्षता देखील घेतली गेली आहे.
आंध्रप्रदेश सरकारने H M P V भारत बाबत अलट जारी केला आहे के पद्मावती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आंध्र प्रदेशचे संचालक म्हणाले की विषाणू कोविड १९ प्रमाणेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा विषाणू पसरतो हे प्रामुख्याने लहान मुले वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना प्रभावित करते आंध्र प्रदेश मध्ये H M P v कोणतेही प्रकरण अद्याप नोंदवलेले गेले नाही याबाबत सध्या काळजी करण्याची गरज नाही एचएमटीव्ही चा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असतो ते म्हणाले की खोकला ,शिंकणे स्पर्श करणे ,आणि बाधित व्यक्तीच्या हात मिळवणे याने हा आजार पसरतो.
H M P V म्हणजे काय? मानवी मेटापिनू मो व्हायरस ज्याला एच एम पी व्ही देखील म्हणतात हा एक विषाणू आहे जो मानवी श्वसन प्रणालीवर परिणाम करतो हे २०२१ मध्ये पहिल्यांदा ओळखले गेले त्यानंतर नेदरलँडच्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला हा P a r a m y x o v i r i d a e कुटुंबातील विषाणू आहे. इतर श्वसन विषाणू प्रमाणे ते खोकताना आणि शिंकताना संक्रमित लोकांच्या जवळ राहून देखील पसरतात गेल्या सहा दशकापासून हा विषाणू जगात अस्तित्वात असल्याचा दावा काही अभ्यासाकांमध्ये करण्यात आला आहे
H M P V चा कोणाला आणि किती प्रमाणात परिणाम होतो? या रोगाचा प्रामुख्याने मुलांवर परिणाम होतो तथापि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या वृद्ध लोकांवर याचा प्रभाव पाहण्यास मिळाला आहे या विषयांमुळे लोकांना सर्दी खोकला ताप आणि कप येण्याची तक्रार होऊ शकते अधिक गंभीर प्रकरणांमध्ये घशा आणि श्वसन मार्गाच्या अडथळ्यामुळे लोकांच्या तोंडातून शिट्टी सारखा आवाज देखील ऐकू येतो
या विषाणूमुळे लोकांना ब्रोन कायलाइटिस (फुफुसात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या नळ्यांचा जळजळ) आणि न्यूमोनिया उपसात पाणी भरणे याचा त्रास होऊ शकतो यामुळे संक्रमित लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.या रोगाची लक्षणे कोरोना व्हायरस संसर्ग आणि सामान्य सारखेच असल्याने दोघांमधील फरक सांगणे कठीण आहे परंतु जिथे प्रत्येक मोसमात कोरोना व्हायरस साठीचा रोग पसरतो तर H M P V हा रोग आत्तापर्यंत मुख्यतः हंगामी संसर्ग मानला जातो मात्र अनेक ठिकाणी त्याची वर्षभर उपस्थिती नोंदविण्यात आली आहे कोरोना व्यतिरिक्त या विषाणूमुळे वरच्या आणि खालच्या दोन्ही शोषण मार्गांमध्ये संसर्ग होण्याचा धोका असू शकतो सामान्य प्रकरणांमध्ये या विषाणूचा प्रभाव तीन ते पाच दिवस टिकतो.
सध्या या रोगापासून संरक्षण करण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही याशिवाय अँटीव्हायरस औषधाचा ही त्यावर परिणाम होत नाही अशा परिस्थितीत अँटीव्हायरल चा वापर मानवाची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतो या विषाणू ने त्रस्त असलेले लोकांना लक्षणे कमी करण्यासाठी काही औषधे दिली जाऊ शकतात तथापि व्हायरस नष्ट करण्यासाठी अद्याप कोणत्याही उपचार उपलब्ध नाहीत यामुळेच राज्य सरकार अलर्ट मोडवर आले असून राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांनी ३ जानेवारी रोजी एक परिपत्रक काढून ते राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठवले आहे यामध्ये त्यांनी काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शक तत्त्वांची अमोल बजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
त्यामध्ये त्यांनी हस्तांदोलन करू नये ,टिशू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये, आजारी लोकांशी जवळचा संपर्क करू नये, डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे टाळावे अशा सूचना राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालय पुणे याचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे.
एकंदरीत कर्नाटकामधील बंगळूर मधील सापडलेल्या या विषाणूजन्य रोगाच्या रुग्णांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था देखील खडबडून जागे झाले असून त्यांनी एक परिपत्रक काढले असले तरी राज्यात पुन्हा एकदा covid सारखे परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकार उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत नागरिकांना मास्क लावण्याबाबत अधिसूचना जारी करण्याबाबत तसेच गर्दीच्या ठिकाणी घ्यावयाची दक्षता व लसीकरणाबाबत कोणती उपाययोजना जारी करते याकडे उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत प्रामुख्याने निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.