बँक ऑफ इंडिया च्या वतीने 666 दिवसांची उच्च परतावा मुदत ठेव योजना.बँक ऑफ इंडियाने खातेदार तसेच ठेवीदार ग्राहकांसाठी “666 दिवसांची मुदत ठेव” लाँच केली असून जी सुपर ज्येष्ठ नागरिकांना रु. 2.00 कोटींपेक्षा कमी ठेवींवर वार्षिक 7.95% पर्यंत उच्च परतावा देते.
ग्राहक आणि सामान्य लोक “666 दिवसांची मुदत ठेव” उघडून गुंतवणुकीच्या या अनोख्या संधीचा लाभ घेऊ शकतात. जे मुदत ठेवींवर शंभरहून अधिक परतावा देते असणारी बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखाधिकारी यांच्याकडून यासाठी ग्राहकांना तसेच ठेवीदार यांना आवाहन केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण नाजिकच्या बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन शाखाधिकारी यांच्याशी त्वरित सम्पर्क करावा.
किंवा बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालयं अलिबाग रायगड येथे 02141-223895, 222269 सम्पर्क करावा असे आवाहन श्री.मुकेश कुमार, विभागीय कार्यालय प्रमुख अलिबाग रायगड यांनी केले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.