नवी दिली :
ईपीएफओच्या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे बंधनकारक आहे. दिलेल्या तारखेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास ELI योजनेचा लाभ मिळणार नाही.
केंद्र सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ELI योजनेत नव्या कर्मचाऱ्यांना DBT मार्फत थेट लाभ दिला जातो. प्रक्रियेसाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2024 आहे.
यूएएन कोण अॅक्टिव्हेट करू शकेल?
-
स्टेप १: यूएएन अॅक्टिव्हेट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ईपीएफओ मेंबरला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या पोर्टलवर जावं लागेल.
-
स्टेप २: त्यानंतर महत्वाच्या लिंक सेक्शनमध्ये जा आणि अॅक्टिव्ह यूएएनवर क्लिक करा.
-
स्टेप ३: या ठिकाणी आपला यूएएन नंबर, आधार नंबर, जन्मतारीख आणि आधार लिंक्ड मोबाइल नंबर टाका. यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी मिळेल.
-
स्टेप ४: ओटीपी टाकून अॅक्टिव्हेशन पूर्ण करा, त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड येईल.