CM यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बच्चू कडू यांचं आंदोलन अखेर मागे

Bachchu Kadu
महाड (मिलिंद माने) :
माजी राज्यमंत्री व दिव्यांगांचे नेते ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या व शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर अन्नत्याग आंदोलन चालू केले होते. या आंदोलनाला दिव्यांगांचा वाढता प्रतिसाद बघता हे आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी रोजगार हमी मंत्री गोगावले व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांना आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन अखेर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतले.
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथे माजी राज्यमंत्री व दिव्यांगांचे नेते ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन चालू केले होते, हे आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन व विधिमंडळात याबाबत विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यामार्फत बच्चू कडू यांना आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले.
माजी राज्यमंत्री व दिव्यांगांचे नेते ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी पाचाड येथे अन्नत्याग आंदोलन चालू केले होते. या आंदोलनात दिव्यांगांना अंत्योदय योजनेतून आणि रोजगार हमी योजनेतून लाभ देण्याची मागणी सरकारकडे केली होती. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व एकनाथ शिंदे यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बच्चू कडू यांच्या समवेत मंत्रालयात बैठक घेऊन याबाबतच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दोन्ही मंत्री महोदयांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांना दिल्याने बच्चू कडू यांनी अखेर रोजगार हमी मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीत शिरा व लिंबू पाणी घेऊन आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading