Chondi मध्ये ऐतिहासिक Cabinet बैठक! मंत्रालयात ५ ते ७ मे दरम्यान शुकशुकाट

 

Rajya mantrimandal baithak

मुंबई (मिलिंद माने) :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी दिनानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक यावेळी चोंडी (तालुका जामखेड) या ठिकाणी होणार असल्याने या बैठकीसाठी राज्य मंत्रिमंडळासहित संपूर्ण मंत्रालयातील सचिवांसहित मंत्र्यांचे कर्मचारी उपस्थित राहणार असल्याने( ५ मे पासून ७ मे पर्यंत) सोमवारपासून बुधवारपर्यंत मंत्रालयात शुकशुकाट पाहण्यास मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक मुंबईतील मंत्रालयातील सातवा माळा अथवा सह्याद्री अतिथिगृहामध्ये पार पडत असते, मात्र यंदाची मंत्रिमंडळाची बैठक ही अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी दिनानिमित्त चोंडी( तालुका जामखेड) येथे ६ मे. रोजी होत असून या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ या बैठकीसाठी चोंडीमध्ये दाखल होणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक अहिल्यानगर मधील चोंडी तालुका जामखेड येथे होत असून ही बैठक होण्यासाठी विधान परिषदेचे विद्यमान सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी आग्रह धरला होता त्यांच्या आग्रहामुळेच या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक अहिल्या नगर मधील चोंडी तालुका जामखेड येथे होत असून या बैठकीसाठी राज्याचे मंत्रिमंडळ सहित किमान ६००व्ही व्ही आय पी, यांच्यासहित उपसचिव दर्जाचे अधिकारी व मंत्री महोदयांचे कर्मचारी, खाजगी सचिव, मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यासह स्वीय सहाय्यक व पोलीस बंदोबस्तासाठी असणारे गृह खात्याचे अधिकारी यांच्यासह राज्य राखीव दलाचे पोलीस ,होमगार्ड. असे जवळपास २००० व्यक्ती. या कार्यक्रमासाठी चोंडी मध्ये उपस्थित राहणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक चोंडी तालुका जामखेड येथे पहिल्यांदाच होत असून या बैठकीसाठी येणाऱ्या मंत्र्यांसहित शासकीय अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था महिला बचत गटामार्फत होणार आहे यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया हे या परिस्थितीचा आढावा घेत आहेत
राज्य मंत्रिमंडळाच्या चोंडी तालुका जामखेड येथील साप्ताहिक बैठकीमुळे सोमवार ५ मे पासून ७ सात मे पर्यंत मंत्रालयात सर्व शासकीय अधिकाऱ्यांसहित मंत्र्यांचा शुकशुकाट पाहण्यास मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading