
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
सीपीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये रायगड पोलिस विभागाने राज्यात पुन्हा एकदा कामाच्या ठसा उमटविला आहे. माहे जुलै २०२४मध्ये पुन्हा एकदा २९१ गुणांपैकी १९८गुण प्राप्त करून ९८.५१ टक्के गुणांसह राज्याच्या गुणांकनात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
दरमहा पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मासिक कामगिरी अहवाल घेण्यात येतो. रायगड जिल्हयाने सातत्यपुर्ण चांगली कामगिरी करीत राज्याच्या मासिक गुणांकनात दरमहा प्रथम तिन मध्ये स्थान प्राप्त केले आहे. माहे फेबु्रवारी २०२४ मध्ये व्दितीय क्रमांक, माहे जानेवारी,मार्च, एप्रिल,जुन मध्ये तृतीय क्रमांक व आता माहे जुलै २०२४ मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत पुन्हा एकदा रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे
पोलीस अधीक्षक रायगड व अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक, कार्यालय येथे स्थापीत सीसीटीएनएस कक्ष व पोलीस ठाणेस नियुक्त प्रशिक्षीत पोलीस अंमलदार यांनी ही प्रशंसनिय कामगिरी केली आहे.
रायगड जिल्हयाने पोलीस ठाणेस दाखल होणारे गुन्हे, अहवाल यांची सीसीटीएनएस मधील फॉर्मची तत्काळ नोंदणी, महिलां/बालके यांच्या विरूध्दच्या गुन्हयांची मुदतीत निर्गती, सिटीझन पोर्टल वरील प्राप्त तक्रारींची तत्काळ निर्गती, सीसीटीएनएस प्रणालीचा वापर करून करण्यात येणारे गुन्हे प्रकटीकरण, मिसिंग व्यक्ती/अनोळखी मयत व्यक्ती यांची जुळवणी तथा मागिल पुर्वइतिहास सापडलेल्या आरोपीतांवरील प्रतिबंधक कारवाई यामध्ये विशेष कामगिरी करीत सदरचे यश प्राप्त केले आहे.
रायगड जिल्ह्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक रायगड अशोक दुधे व तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे स्थापीत सीसीटीएनएस कक्ष स्थापन करण्यात आला असून स्थापने पासून आज पर्यंत रायगड पोलिस दलाने रायगड पोलिस विभागाने आपले यश कायम राखत आले आहेत.
रायगड पोलीस दलाने सदर प्रणाली च्या उत्तम कामगिरी मध्ये सातत्य कायम ठेवले आहे व यापुढेही जिल्हा अग्रस्थानी ठेवण्याकरीता प्रयत्नशिल राहील.
…सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड