PEN न्यूज ऑनलाइन टीम
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाने 20 ऑक्टोबर रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत.
दरम्यान, काँग्रेसच्या गोटातूनही मोठी माहिती समोर आली आहे. काँग्रेसमध्ये एकूण 54 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी 22 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीतील काही उमेदवारांची नावेही समोर आली आहेत.
निश्चित झालेल्या उमेदवारांची नावं
-
नाना पटोले – साकोली
-
विरेंद्र जगताप- धामणगाव
-
यशोमती ठाकूर- तिवसा
-
विजय वडेट्टीवार- ब्रमपुरी
-
अमित झनक- रिसोड
-
नितीन राऊत- उत्तर नागपूर
-
विकास ठाकरे- पश्चिम नागपूर
-
रणजित कांबळे- देवळी (वर्धा)
-
सुभाष धोटे- राजूरा ( चंद्रपूर)
-
डॉ सुनील देशमुख – अमरावती शहर
-
बबलू देशमुख- अचलपूर