‘BMC’मध्ये मोठी भरती; असा करा अर्ज

Bmc12 660x330
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
BMC (बृहन्मुंबई महानगरपालिका) मध्ये १० वी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरी करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी  रिक्त असलेल्या पदांकरिता पुरुष व महिला होमगार्डच्या २७७१  जागांची भरती करण्यात येणार आहे.  
 या भरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून सदर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १० वी पास असणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्णसंधी असून आवश्यक कागदपत्रांसह १० जानेवारी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पदाचे नाव : 
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार होमगार्ड या पदासाठी सदर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता :  १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे 
होमगार्डसाठी पात्रता : उमेदवाराची उंची ही पुरुषांकरता १६२ सेमी महिलांकरता १५० सेमी गरजेची आहे. छाती- (फक्त पुरुष उमेदवारांकरता)- न फुगविता किमान ७६ सेमी गरजेची असते.
पदसंख्या :  एकूण २७७१ पदांवर भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा :  २० ते ५० वर्ष 
आवश्यक कागदपत्रे : 
रहिवासी प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (10वीचे प्रमाणपत्र)
जन्मतारखेचा पुरावा
शाळा सोडल्याचा दाखला
३ महिन्याच्या आतील पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र
असा करा अर्ज  : 
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम BMC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. नंतर ऑनलाइन पद्धतीने सविस्तर माहिती भरून अर्ज करावा लागेल. अर्जाची अंतिम तारीख ही १० जानेवारी २०२५ असणार आहे.
होमगार्डचे नेमकं काम : 
देशात होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जाते. होमगार्ड ही नोकरी किंवा रोजगार नसून आपत्कालिन स्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या मागणीनुसार त्यांना बंदोबस्तासाठी बोलवले जाते. अग्निशमन, विमोचन, महामारीकाळात, संपकाळात प्रशासनाच्या मदतीसाठी होमगार्डची नियुक्ती करण्यात येते.
होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज :
https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या बृहन्मुंबईतील उमेदवारांनी नोंदणीकरीता अर्ज करावा.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading