जर तुम्ही ॲपल (Apple) युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद टीम (CERT-In) ने Apple युजर्ससाठी धोक्याची चेतावणी दिली आहे. CERT-In द्वारे जारी केलेल्या ॲडव्हायझरीनुसार, अनेक ॲपल उपकरणे – आयफोन, आयपॅड, मॅकबुक आणि ब्राउझर सफारी यांना धोका आहे. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आलेल्या या इशाऱ्यानुसार, Apple युजर्सना त्यांचे फोन अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून धोके टाळता येतील.
या इशाऱ्यानुसार, ॲपलच्या विविध उत्पादकांमध्ये अनेक सुरक्षा धोके शोधले गेले आहेत. iOS, iPadOS, macOS, tvOS, watchOS, visionOS, आणि सफारीच्या विविध आवृत्त्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. हा धोका ॲपल युजर्सच्या संवेदनशील माहितीसाठी गंभीर ठरू शकतो, आणि त्यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेसाठी त्वरित अपडेट करणे गरजेचे आहे.
इशाऱ्यानुसार प्रभावित सॉफ्टवेअर:
iOS आणि iPadOS: 18.1 च्या आधीचे
iOS आणि iPadOS: 17.7.1 च्या आधीचे
Mac Sequoia: 15.1 च्या आधीचे
Mac Sonoma: 14.7.1 च्या आधीचे
Mac Ventura: 14.7.1 च्या आधीचे
watchOS: 11.1 च्या आधीचे
tvOS: 18.1 च्या आधीचे
visionOS: 2.1 च्या आधीचे
Safari: 18.1 च्या आधीचे
आयफोन युजर्सनी काय करावे?
सर्व Apple युजर्सनी त्यांचे डिव्हाइसेस लेटेस्ट सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करून घ्यावेत. Apple ने अलीकडेच iPhone युजर्ससाठी iOS 18.1 जारी केले आहे, त्यामुळे पात्र डिव्हाइसेसच्या युजर्सनी त्वरित अपडेट करणे आवश्यक आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.