Alibag Rape Case : मद्य पाजून पिडीत महिलेवर आळीपाळीने बलात्कार केल्याप्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Rape
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलिस स्टेशन हद्दीत आरोपी सुरेश लहानु नाईक(रा. कोळघर, आदिवासीवाडी, ता. अलिबाग व विशाल कृष्णा म्हात्रे( रा. तळाशेत, पो. पोयनाड, ता. अलिबाग ) पिडीत महिलेवर आळीपाळिने तिच्या संमतीशिवाय व बळजबरीने मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश, श्री. ए. एस. राजंदेकर यांनी आरोपींना दोषी पकडून १० वर्षांची शिक्षा व प्रत्येकी रक्कम रु. १०,०००/- चा दंड ठोठावला आहे. तसेच भा. द. वि. सं. कलम ३२८ नुसार मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी पकडून ०२ वर्षांची शिक्षा व प्रत्येकी रक्कम रु. ५,०००/- चा दंड ठोठावला असून सदरची शिक्षा दोन्ही आरोपींना एकत्रिकरित्या भोगण्याची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील मौजे तळाशेत गावचे ह‌द्दीत तळाशेत ते वडवली रोडवर, नेटको कंपनीच्या टेकडीवर रविवार दिनांक १९/१२/२०२० रोजी २२.१५ वाजण्याच्या सुमारास सुरेश लहानु नाईक व विशाल कृष्णा म्हात्रे यांनी संगनमत करुन यांतील पिडीत महिला ही तिच्या मुलीकडे तळोशेत वाडीवर गेली असता, ती एकटी असल्याचा फायदा घेवून तिस पाठीमागून पकडुन झाडी झुडपात खेचत नेवुन तिस जबरदस्तीने दारु पाजून सदर दोन्ही आरोपीत यांनी तिचे कपडे कावुन तिच्यावर आळीपाळीने जबरी संभोग केला.
सदर पिडीत महिला ही आदिवासी समाजाची असल्याचे माहित असताना देखील त्यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. फिर्यादी हे पिडीत हिचा शोध घेण्यास तळाशेत वाढीवर गेला असता तळाशेत गावचे वरचे डोंगरामध्ये पिडीत हिचा आवाज ऐकूण फिर्यादी हे त्या दिशेने गेले असता आरोपीत हे पिडीत हिच्यावर अत्याचार करीत असताना त्यांना ओरडला व त्यांचे फोटो काढले असता आरोपीत यांनी फिर्यादी यांच्या अंगावर दगडफेक केली म्हणून फिर्यादी यांच्याकडून फिर्याद दाखल करण्यात आली व त्यानुसार पोयनाड पोलीस ठाणे येथे त्यांच्यावर भा. द. वि. सं. कलम ३७६ (ड), ३३६, ३२८ सह ३४ व अ.जा.अ.ज. अत्याप्रतिबंधक कायदा कलम ३(१) (डब्ल्यु) (आय) या कलमांतर्गत दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याप्रमाणे मा. न्यायालयाने त्यांना सदर गुन्हयात दोषी पकडून दोन्ही आरोपीना १० वर्षांची शिक्षा व प्रत्येकी रक्कम रु. १०,०००/- चा दंड ठोठावला आहे. तसेच भा. द. वि. सं. कलम ३२८ नुसार न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी पकडून ०२ वर्षांची शिक्षा व प्रत्येकी रक्कम रु. ५,०००/- चा दंड ठोठावला आहे.
हया प्रकरणी सदर केसचा अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली तु. कदम ,व त्यांच्या सहकार्यांनी जलद गतीने तपास पूर्ण करून मोलाची सहकार्य केले. सदर खटल्यात विशेष शासकिय अभियोक्ता स्मिता राजाराम धुमाळ-पाटील यांनी एकूण १५ साक्षीदार तपासून युक्तीवाद केला. त्यामध्ये फिर्यादी, पीडीत साक्षीदार, सहा.रासायनिक विश्लेषक, नायब तहसिलदार अलिबाग, वैद्यकिय अधिकारी आणि प्राथमिक तपासिक अंमलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची साक्ष कोर्टासमोर महत्वपूर्ण ठरली. तसेच पोलिस हवालदार सचिन खैरनार, पैरवी कर्मचारी महिला पोलिस शिपाई प्रियांका सायगावकर, यांचे सहकार्य मोलाचे ठरले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading