ALibag: लघुशंका करीत असताना पुणे येथील मद्यपी पर्यटक कार्लेखिंड येथील दरीत पडला

ALibag: Drunk tourist from Pune falls into a valley in Karlekind while urinating
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
अलिबाग-पेण मार्गावर कार्ले खिंडीत असणाऱ्या पात्रूदेवी नजिक रविवारी सायंकाळी पुणे येथील मद्यपी पर्यटक हरिश्चंद्र गोसावी हा कठड्यानजिक उभा राहून लघुशंका करीत असताना तोल गेल्याने तो दरीत कोसळून जखमी झाला. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे येथून हरिश्चंद्र गोसावी आणि त्याचे मित्रमंडळी हे फोरव्हीलर अलिबाग येथे पर्यटनासाठी आले होते. अलिबाग येथील पर्यटन स्थळी भेट दिल्यानंतर पर्यटकांनी मद्यपान पार्टी केली. संध्याकाळच्या सुमारास हरिश्चंद्र गोसावी हे आणि त्याचे मित्र पुणे येथे जाण्यासाठी निघाले होते.
अलिबाग पासून काही अंतरावर असणाऱ्या कार्ले खिंडीत असणाऱ्या पात्रूदेवी नजिक गाडी उभी करून हरिश्चंद्र गोसावी हे लघुशंका करण्यासाठी कठड्यानजिक गेले असता लघुशंका करीत असताना तोल गेल्याने हरिश्चंद्र गोसावी हे दरीत कोसळले. हरिश्चंद्र गोसावी हे दरीत कोसळले असल्याने त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी वाचविण्यासाठी तेथून जाणाऱ्या नागरिकांकडे मदत मागितली. तेथे जमलेल्या सुजान नागरिकाने तात्काळ वाहतूक कर्मचारी यांना संपर्क साधला असता वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार अमित साळुंखे आणि रुपये शिर्के यांनी तातडीने घटना स्थळी दाखल होत त्यांनी तेथे असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांची मदत घेत अर्धा पाऊण तासाच्या अथक प्रयत्नाने हरिश्चंद्र गोसावी यांना जखमी अवस्थेत दरीतून बाहेर काढले आणि ताबडतोब त्यांना कार्लेखिंडी नजिक असणाऱ्या गोठेघर येथील प्रयास रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले.
प्रयास हॉस्पिटल मध्ये डॉ. रवी म्हात्रे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी पुणे येथे पाठवले. डॉ म्हात्रे यांनी सांगितले की, हरिश्चंद्र गोसावी यांच्या मानेला जखम झाली होती तसेच हातापाया मध्ये ताकत राहिली नव्हती म्हणून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकाद्वारे पुणे येथे जखमी याचे मित्र मंडळी घेऊन गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading