रायगड जिल्ह्यातील नवखार येथे हनुमान पालखी घरासमोर का नाही थांबविली या बाबत विचारणा केली असता विशाल उत्तम पाटील, समाधान उत्तम पाटील, आशु विशाल पाटील, प्रकाश सिताराम पाटील, राजेश प्रकाश पाटील, वैभव दिलीप पाटील, विक्रम उत्तम पाटील, जयेंद्र रमाकांत वर्तक(सर्व जण राहणार – रांजनखार डावली, नवखार तालुका अलिबाग) यांच्याविरोधात अस्मिता प्रमोद पाटील (वय ३३ वर्षे रांजनखार डावली,रा.नवखार ता. अलिबाग जि.रायगड) हिने मांडवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग तालुक्यातील नवखार येथे दिनांक १२/०४/२०२५ रोजी रात्रौ ११.१५ वाजताचे सुमारास आमचे गावात श्री. हनुमान जयंतीचा पालखी कार्यक्रम चालु असताना सदरची पालखी आमचे गावातील रामनाथ सदु पाटील यांचे घराजवळ आली असता अस्मिता पाटील व त्यांची जाउ ऋतुजा सुजित पाटील व घरातील इतर माणसे पुजा करण्यासाठी जात असताना पालखे सोबत असणारे नवखार गावातील राहणारे विशाल उत्तम पाटील, समाधान उत्तम पाटील, आशु विशाल पाटील, प्रकाश सिताराम पाटील, राजेश प्रकाश पाटील, वैभव दिलीप पाटील, विक्रम उत्तम पाटील, जयेंद्र रमाकांत वर्तक यांनी पालखी पुजा करण्यासाठी न थांबवता पुढे घेवुन गेले म्हणुन त्यांना विचारले कि, पुजा करायची आहे. असे विचारताच पुर्ववैमनस्याचा वादाचा मनात राग धरून त्यांनी शिवीगाळी करून त्यांचे पैकी आशु विशाल पाटील यांनी अस्मिता पाटील यांचे पती प्रमोद यांचे डोक्यात लोखंडी रॉडने मारून दुखापत केली म्हणुन अस्मिता पाटील नातेवाईक भांडणे सोडविण्यास गेले असता विशाल उत्तम पाटील, प्रकाश सिताराम पाटील यांनी माझी मान धरून शिवीगाळी केली. तसेच इतर जणांनी आम्हांला शिवीगाळी करून मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर अस्मिता पाटील यांचे पती प्रमोद यांचे डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने त्याला घेवुन जिल्हा रुग्णालयात औषध उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. तसेच मा.जिल्हादंडाधिकारी सो., रायगड अलिबाग यांचेकडील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत मांडवा (सागरी) पोलीस ठाणे गुरनं. 45/2025, मुंबई पोलीस अधिनियम, 1951 37(1) (3), भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 352,351(2), 190, 191(2),191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सुधीर पाटील हे करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.