जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या माध्यमातून राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम (NCD) च्या राष्ट्रीय वृद्धापकाळ सुश्रुषा कार्यक्रमांर्तगत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी (महिला व पुरुष) यांच्याकरिता तीन दिवसीय आयोजन केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी अति.मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, आर.सी.एफ.थळचे कार्यकारी संचालक नितीन हरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी – घुगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण शिंदे,कान, नाक, घास तज्ञ डॉ.निशिकांत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
जेष्ठ नागरिकांकरिता आयोजित शिबिराच्या उदघाटन प्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत वेळोवेळी अशाप्रकारची शिबीर आयोजित करण्यावर भर दिला जाईल असे सांगितले. तसेच जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाची नवी इमारतीची लवकरच सुरुवात होईल जनतेच्या सेवेत येईल. रुग्णांना सर्व सुविधा व उपचार एका छताखाली उपलब्ध व्हावीत याकरिता प्रयत्नशील आहोत.
जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले. जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच जेष्ठ पत्रकार मदन दामले यांनी मनोगत व्यक्त करताना सदर शिबिराबद्दल आभार मानले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक सादर करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी शिबिराची पार्श्वभूमी व शिबीरा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या उपचार सुविधा याविषयी सविस्तर माहिती दिली.
या शिबिरामध्ये मेडिसीन विभाग-उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात तपासणी व उपचार, हृदयरोग-गरजेनुसार २D ECHO, X -ray, USG, ECG (stemi), डोळ्यांची तपासणी-ळ्यांचे आजार व मोतिबिंदू चेकअप, मोफत चष्मे वाटप, स्त्रीरोग तपासणी-महिलांचेआजार, स्तन कर्करोग व गर्भाक्षयमुख कर्करोग तपासणी, नाक,कान, घसा तपासणी-ENT तपासणी व शस्त्रक्रिया, गरजेनुसार एन्डोस्कोपीद्वारे कानाची श्रवण वाटप, ऑर्थोपेडिक-चेकअप, एक्स-रे, फिजिओथेरपि सुविधा, दंत विभाग – मुख आरोग्य तपासणी, दातांचे आजार, कवळी बसवणे, सर्जरी-हर्निया, हायड्रोसिल तपासणी व शस्त्रक्रिया, मानसिक-मानसिक आजार तपासणी, उपचार व तपासणी, आयुष-पंचकर्म, आयुर्वेद उपचार, समुपदेशन, आभाकार्ड- मोफत आभाकार्ड काढून दिले जाईल तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार रक्ताच्या चाचण्या मोफत केल्या जातील.
या आरोग्य शिबीराकरिता विशेष सहकार्य करणारे जेष्ठ पत्रकार मदन दामले व सदानंद खामकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या शिबिराच्या पहिल्या दिवशी 121 जेष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिसेवीका, सहा.अधिसेवीका, नर्सिंग ऑफिसर, परीसेवीका, सार्व. आरोग्य परिचारिका, अधिपरिचारिका, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयांमधील व ओपीडीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विषेश परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समुपदेशक, सिकलसेल प्रतिम सुतार यांनी केले.
दि.26, 27, 28 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथे सकाळी 09.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत तीन दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने केले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.