रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ते बेलकडे फाटा दरम्यान असलेल्या आक्षी पुलानजिक स्कोडा गाडीचा अपघात अपघात होवून सूरज राहुल देशपांडे (34 भैरव नगर, कुसगाव लोणावळा पुणे ) याचा मृत्यू झाला असल्याबाबतची फिर्याद निलेश ज्ञानेश्वर पवार (32 रा.मंडावरे, पो टाकवे खुर्द, ता.मावळ, जि.पुणे) यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत सूरज देशपांडे हा त्याचा मित्र निलेश पवार यांच्यासह एकमित्र असे तिघेजण लोणावळा मयत सूरज यांची त्याची स्कोडा गाडी कमांक एम.एच.४३. एआर ४२२० ही घेवुन २७/०१/२०२५ रोजी रात्री १०:३० वाजता लोणावळा येथुन फिरण्याकरीता नागाव अलिबाग येथे फिरण्यासाठी आले होते. मंगळवार दिनांक २८/०१/२०२५ रोजी पहाटे ०४:३० वाजताच्या सुमारास नागाव येथे पोहोचलो त्यानंतर तेथील समुद्रकिनारी फिरुन परत तिघेजण लोणावळा येथे जाण्यास निघालो. त्यावेळी गाडी सुरज देशपांडे हा चालवित होता व मयत देशपांडे याच्या वाजुच्या सिटवर निलेश पवार बसलेला होता.
सकाळी ०६:३० वाजताच्या सुमारास आक्षी पुलाचे पुढे लहान वळणाजवळ आलेवेळी सुरज देशपांडे याचा अचानकपणे गाडीवरील ताबा सुटुन स्कोडा गाडी रस्त्याच्या उजव्या बाजुला रॉगसाईडला जावुन साईडपट्टीवर असलेल्या झाडाला ठोकर लागुन पलटी झाली. अपघात झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने निलेश पवार यांना प्रथम बाहेर काढण्यात आले.
तसेच मयत सुरज देशपांडे यास सुध्दा त्या नागरिकांच्या मदतीने गाडीबाहेर काढले. त्यावेळी मयत सुरज देशपांडे याच्या मानेवर गळयाजवळ जखम होवुन त्यामधुन खुप रक्त येवुन तो बेशुध्द झाला होता. त्यानंतर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने सरकारी १०८ रुग्णवाहिका तेथे बोलावुन त्यामधुन मयत सुरज देशपांडे यास उपयाराकरीताा सिव्हील हॉस्पीटल, अलिबाग येथे आणले असता अपघात विभागात डॉक्टरांनी त्यास सकाळी ०७:२९ वाजता तपासुन तो उपचारापुर्वीच मयत असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगीतले.
अपघात घटनास्थळी उपस्थित नागरिकाचे म्हणणे आहे की सदर अपघात ग्रस्त वाहनातील व्यक्ती ह्या मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाला आहे.. याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.