मुंबई -गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका ही सुरू असतांनाच सोम.दि.१० फेब्रु. २०२५ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास महामार्ग एन. एच. ६६ वर सुकेळी गावाच्या हद्दीमध्ये जिंदल कंपनीच्या समोरच डंपर चालकाचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे डंपर पलटी होऊन अपघात घडला. मात्र यावेळी अपघात घटनास्थळावरुन डंपर चालकाने गाडीमधून ऊडी मारुन तेथुन पळ काढला.
याबाबतीत उपलब्ध माहितीनुसार वडखल बाजुकडुन महाडच्या दिशेने कोळसा घेऊन जाणारा डंपर क्रं. MH.४६ CL ५१४० सुकेळी गावाजवळ आला असता चालकाचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या डाव्या बाजूला साइडपट्टीवरुन डंपर पलटी होऊन अपघात झाला. अपघातानंतर डंपर चालकाने अपघात घटनास्थळावरुन पळ काढला. याच ठिकाणी मागील एका महिन्यापासून तीन ते चार अपघात घडण्याच्या घटना घडल्या असुन या ठिकाणी साइडपट्टीच्या खाली माती किंवा खडीचा भराव करण्याची मागणी येथिल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोकळे यांनी केली आहे.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच वाकण टॅबच्या वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघाताची पाहणी करीत वाहतुक सुरळीतरित्या सुरु ठेवण्यात आली. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.