Accident: कोलाड येथे ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Accident Kolad
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
मुंबई गोवा महामार्गावर ट्रेलरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आंबेवाडी नाका येथे घडली. सदरील घटनेने कोलाड परिसरात एकच खळबळ उडाली. 
या बाबत प्राप्त माहिती नुसार, सोमवार दि. २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.१५ वा.आंबेवाडी नाका येथील शिवकांत गॅरेज व विजय वाईन शॉप दुकाना समोर  आपल्या ताब्यातील ट्रेलर वाहन चालक सायरलाल खमान गुजर ( ३३ वर्ष ) रा. बहादूरपुरा पो. दौलतपुरा ता. मसुदा विजयनगर जि. अजमेर राजेस्थान, ट्रेलर क्र आर. जे. ०६ जी. डी. ७७१४ यांनी रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटार सायकल क्र. एम एच ०३डी टी ४१४८ चालक विजय कुमार सिन्नदुराई गोकगिलिखान ( वर्ष ३७ )रा. सिन्नादुराई घर क्र. २३८ स्टीट रोड व्हिएस पुरम विरथरेड डिपल्ली तामिळनाडू याला जोरदार धडक दिल्याने मोटार सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला असुन दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
याविषयी कोलाड पोलिस ठाण्यात ११३/२०२४भारतीय संहिता २०२३ नुसार कलम १०६(१)२८१, १२५, (अ)१२५ (ब )मो. वा. का. कलम १८४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन अधिक तपास सपोनि एस ए कुलकर्णी नागोठणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पो. अंमलदार एस जी भोजकर,अंमलदार सी. के कुथे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading