मुंबई-गोवा हायवे वरील कोलाड हद्दीतील कोकण रेल्वे पुलाखाली रस्ता ओलांडतांना मारुती सेलेरियो कारला गोवा बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, रात्री ११ : १० वा मुंबई-गोवा हायवे वरील कोलाड हद्दीतील कोकण रेल्वे पुलाखाली खांब बाजुकडून रोहा येथे जाण्यासाठी कोलाड येथील कोकण रेल्वे पुलाखालून उजव्या बाजूला ग.द.तटकरे हायस्कूल कडे जाण्यासाठी रस्ता ओलांडतांना मारुती सेलेरियो गाडी क्र.एम एच ४७/डब्लू १७६५ या गाडीला गोवा बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या ट्रेलर क्र. एम एच ४३ बिएक्स ९५१९ यावरील चालक याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन मारुती सेलेरियो कारला जोरदार धडक दिल्यामुळे या अपघातात योगेश सुधाकर गुरव रा. वैभव नगर वरसे ता. रोहा व परेश नामदेव खांडेकर रा.राम मंदिर जवळ, मराठा आळी,अष्टमी रोहा यांचा जागीच मृत्यू झाला असुन योगेश मनोहर पाटील रा. वरसे हा गंभीर जखमी झाला आहे.
यावेळी ट्रेलर चालक शेरसिंग ओमप्रकाश यादव रा.चरणदिप घाट मलकापूर, संभल उत्तर प्रदेश याला कोलाड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गु.र.नं ३०/२०२४ भादवी कलम ३०४ (अ )२७९,३३७,३३८,मो. वा का प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहा शैलेश काळे,सपोनि एन एम मोहिते कोलाड कोलाड पोलीस ठाणे,यांनी घटनास्थळी भेट दिली असून यांच्या मार्गदर्शना खाली पोसई एन एल चौधरी, पोहवा एन व्हाय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.