मुरुड हद्दीतील निसर्ग हाॅटेल जवळच्या रस्त्यावरच्या वळणावर आज सकाळी ८.१० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल व एसटी बसची समोरा समोर धडक लागुन दुचाकी स्वाराचा जागीच मुत्यु झाला. याबाबतची फिर्याद मुरुड पोलिस ठाण्यात निसार दखनी(वय 34 वर्षे,नांदगाव, मुरुड)यांनी दिली आहे.
मिळालेल्या महितीनुसार मुरुड एसटी बस मुरुड आगारातून रेवदंडा मार्गे महाड करिता सकाळी ८.०० वाजता बस क्रमांक एम एच-२० बीएल ०३२८ ही एसटी चालक अविनाश मोहन दिघे वय ४१ व वाहक-प्रशांत बुधनार हे एसटी घेऊन निघाले असता पाच मिनिटांवर निसर्ग हाॅटेलचे समोरील अरुंद व वळणावरील रस्तावर मोटारसायकल चालक अरमान सलीम दखनी हा मुरुड अंजुमन इस्लाम डिग्री काॅलेज मधील एफ वाय बीएससी मध्ये शिकणारा विद्यार्थी रा.मुरुड नादगांव मोहल्ला येथील रहिवासी आपल्या वडीलाची मोटारसायकल क्रमांक एम एच ०६ सी जे ००१७ बजाज कंपनी ची केटीएम १२५ डक गाडी घेऊन निसर्ग हाॅटेलच्या रस्तावरून वळणावर येत असताना भरधाव एसटीची मोटारसायकल चालकांची समोर समोर जोरदार धडक बसल्याने मोठा अपघात होऊन मोटारसायकल चालकांच्या डोक्याला मोठा मार लागल्याने रक्तस्राव होऊ लागला. तात्काळ मोटारसायकल चालकांला मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांनी मोटारसायकल चालकांचा मयत झाले घोषित केले.
या माहिती मिळताच मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी येऊन व ग्रामीण रुग्णालयात येऊन या अपघाताची चौकशी केली.असता यावेळी एसटी चालक -अविनाश दिघे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक -विजयकुमार देशमुख करित आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.