माणगांव ( रविंद्र कुवेसकर ) : माणगांव शहरात पर्यटकांची नेहमी वर्दळ असते अशा वेळी शहरातील मुख्य रस्त्यावरुन देशभरातून, जिल्ह्यातील शहरांतुन ये-जा करणारे पर्यटकांना अस्वच्छतेच अनपेक्षित दर्शन घडते. शहराचे स्वच्छतेला गालबोट लागते. काही अपप्रवृती रात्रीचे अंधारातही गुपचूप कचरा टाकून जात असल्याचेही निदर्शनास येत आहे. या विषयी वास्तवाचे भान राखत नगरीचे मुख्याधिकारी व नगरसेवक यांनी रस्त्यावरील कचऱ्याची गांभीर्याने दखल घेऊन, एकत्रीत चर्चा करुन रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष पहाणी केली असता अस्वच्छतेचे वास्तव निदर्शनास आल्याने आता रात्रपाळीतही तसेच सकाळी असे दोन वेळेस शहर स्वच्छतेचा एक चांगला निर्णय पहिल्यांदाच घेतला आहे.
याप्रसंगी सदर ठिकाणी पाहणी दरम्यान माणगांव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, मुख्याधिकारी संतोष माळी, आरोग्य सभापती दिनेश रातवडकर, पाणीपुरवठा सभापती कपिल गायकवाड, नगरसेवक अजित तार्लेकर, सिटी को ऑर्डीनेटर अतुल जाधव नगर पंचायतीचे सफाई कर्मचारी तसेच घनकचरा व्यवस्थापक रवींद्र मोरे आदी उपस्थित होते.
माणगांव शहरामधील मुख्य रस्ते, हायवे, बाजारपेठ रस्त्यांची सोमवार दि.२२ मे २०२३ पासून रात्रपाळी मद्ये सफाई करण्यात आली. नगरीचे मुख्याधिकारी माळी यांचेशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली असता माणगांव शहरात रात्रीचे वेळी निदर्शनास आलेली समस्या दूर करण्यासाठी माणगांवमध्ये रात्रपाळीत अशा प्रकारे नियमीत स्वच्छतेविषयी एक चांगले पाऊल उचलण्यात आले आहे.
तसेच या बाबत नागरिकांकडून येणाऱ्या रास्त सूचनांचे निराकरण केले जाईल व लोकांचे स्वयंस्फूर्त सहभागातून शहर स्वच्छ सुंदर राखण्यास सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
रात्रीच्या वेळेस प्रवास करताना खाद्यपदार्थ टाकाऊ प्लास्टिक कॅरीबॅग, रॅपर्स, रिकामी पाणी बाॅटल्स टाकण्यासाठी मुख्य रस्त्यावर लवकरच नविन कचरा कुंडी ठेवण्यात येतील. सर्व नागरिक व प्रवासी पर्यटकांनी प्रवास करताना प्लास्टिक कचरा बाॅटल्स इतरस्त्र न टाकता कचराकुंडीतच टाकावे. नागरिकांनी या गोष्टीचे कटाक्षाने पालन करीत सहकार्य केले तर शहर नियमीत स्वच्छ राखण्यात आपण यशस्वी होऊ,असा सकारात्मक विश्वास या वेळी मुख्याधिकारी माळी यांनी व्यक्त केला आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.