राहत्या घरात झालेल्या किरकोळ वादातून रागाच्या भरात एक 58 वर्षीय महिला कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
निरु गणेश पाटील (58) असे या महिलेचे नाव असून उंची 5 फुट 5 इंच, रंग सावळा, डोक्याचे केस काळे लांब, डोळे काळे, नाक सरळ, बांधा मध्यम असून अंगात पिंक कलरची साडी, निळ्या रंगाचा ब्लाऊज घातलेला आहे. तसेच त्यांना मराठी व हिंदी भाषा अवगत आहे.
या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी रबाळे पोलीस ठाणे दुरध्वनी क्र.022-27606162 किंवा पो.हवा.संदीप नवले मो.नं.9867782270 येथे संपर्क साधावा.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.