41 वा रायगड भारत स्काऊट गाईड कब-बुलबुल भव्य जिल्हा मेळावा

41 वा रायगड भारत स्काऊट गाईड कब-बुलबुल भव्य जिल्हा मेळावा
उरण (विठ्ठल ममताबादे) : 
दि.19/1/2025 रोजी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील द्रोणागिरी पर्वत पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या श्रीशैल्य प्रकल्प डाऊरनगर परिसरात रायगड भारत स्काऊट व गाईड भव्य मेळाव्याचे उद्घाटन श्रीम.पुनिता गुरव मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक रायगड,नितीन भोईर उद्योगपती तथा समाजसेवक उरण संतोषजी शेडगे उपशिक्षणाधिकारी अलिबाग, प्रियंका म्हात्रे मॅडम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उरण, सोनाली राठोड मॅडम DGO पेण रायगड, प्रशांत गायकवाड रायगड जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट ,श्रीम. सरिता डफळ मॅडम रायगड जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड, ज्ञानेश्वर कोठावदे माजी मुख्याध्यापक एन आय हायस्कूल उरण मा. प्रथमेश पाटील माजी आदर्श स्काऊट एन आय हायस्कूल उरण, सर्व स्काऊट गाईड संचालक मंडळ, उरण तालुका सर्व केंद्रप्रमुख, सर्व नियोजन समितीचे प्रमुख, सदस्य शिक्षक बंधू भगिनी व अन्य मान्यवर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर मेळावा रायगड भारत स्काऊट व गाईड जिल्हा कार्यालय व रायगड जिल्हा शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दि.16/1/2025 ते 19/1/2025 चार दिवशीय निवासी मेळावा इयत्ता 5वी ते 7वी व 8वी ते 10वी या दोन गटात घेण्यात आला.
16 /1/2025 रोजी कार्यालयीन ध्वजारोहण, आगमन, तंबूरचना,मार्गदर्शन,संचलन, रात्री शेकोटी कार्यक्रमात मुलांचे व सामुहिक सांस्कृतिक कार्यक्रम व दिवेबंद पहारा असा दिनक्रम होता.तर पुढील दिवसात रामधुन बीपी सिक्स,तंबू स्वच्छता,तंबूनिरीक्षण,ध्वजारोहण, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा,रात्री शेकोटी कार्यक्रम, द्रोणागिरी किल्ला हाईक,गावची जत्रा,उरण शहर शोभायात्रा,सर्वधर्मीय प्रार्थना,तर 18 जानेवारी 2025 रोजी कब बुलबुल साठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 537 विद्यार्थी व 63 शिक्षक असे एकूण 600 कब बुलबुल कब लीडर व क्लाफ लीडर सहभागी झाले होते.
विविध नाविन्यपूर्ण स्पर्धा राबवून हा मेळावा संपन्न झाला. या 41 वर्षातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा मेळावा म्हणून रायगड जिल्हा भारत स्काऊट गाईड व कब-बुलबुल मेळावा वेगवेगळ्या दानशूर दात्यांच्या सहकार्याने संपन्न झाला. या चार दिवसात अनेक मान्यवरांनी भेटी देऊन विद्यार्थी शिक्षक व आयोजक, रायगड युनिटचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले. या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संतोषजी शेडगे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक अलिबाग यांच्या संकल्पनेतून स्काऊट- गाईड व कब-बुलबुलच्या रायगड इतिहासात पहिल्यांदाच रायगड जिल्हा परिषद पी.एम.श्री.13 शाळा व अन्य 19 शाळा सहभागी झाल्या होत्या. जवळजवळ 650 स्काऊट- गाईड व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक स्काऊटर- गाईडर व नियोजन समिती असे मिळून 800 लोक दररोज निवासी स्वरूपात रहात होते. या सर्व विद्यार्थ्यांचा सकाळचा चहा नाश्ता दुपारचा चहा सकाळ संध्याकाळची भोजन निवासाची सोय निवासाची व्यवस्था मुला मुलींना आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय व सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्स तसेच प्रोत्साहन पर मार्गदर्शन करणारे उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व तन-मन-धनाने मदत करणारे नितीनजी भोईर व त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्यावतीने करण्यात आले. 
सर्व लोकांना चार दिवस संपूर्ण पाण्याची सोय आदर्श स्काऊट एन.आय.उरण हायस्कूल प्रथमेश पाटील यांच्यावतीने करण्यात आली तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी उन्मेष वाघ साहेब चेअरमन जे. एन. पी. ए उरण यांनी संपूर्ण किट ची व्यवस्था करून दिली. ज्ञानेश्वर कोठावदे यांनी चार दिवस आरोग्यसेवा पुरवली विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना उत्तेजित करण्यासाठी तसेच शिस्त व स्वावलंबनाला चालना देण्यासाठी हा मेळावा निश्चित फलदायी ठरणारा असा होता.
या मेळाव्याला भेट देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उपशिक्षणाधिकारी सुनिल भोपळे साहेब, संतोष शेडगे साहेब उपशिक्षणाधिकारी, श्रीमती कल्पना काकडे मॅडम विस्ताधिकारी अलिबाग, मोहिते साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पनवेल,साबळे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अलिबाग, सचिन पाटील, श्री.कालंग , धुळे सर जिल्हा परिषद ,शेडगे मॅडम, विविध पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक वर्ग,पालक भेट देत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तंबू सजावटीचे कौतुक करत होते. विद्यार्थ्यांनी चार दिवस विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या प्राविण्याचा गुण गौरव शेवटच्या दिवशी करण्यात आला.
या कार्यक्रमाला नितीनजी भोईर उद्योजक व या कार्यक्रमाचे दाते महेशजी म्हात्रे माजी पं.स सदस्य तथा संचालक सदस्य एन.आय.उरण, रवी दादा भोईर समाजसेवक,सुनील भोपळे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक अलिबाग शेडगे साहेब उपशिक्षणाधिकारी प्राथमिक अलिबाग अरूण सप्ताळे भारत स्काऊट गाईड महाराष्ट्र राज्यचिटणीस गोपाळ जाधव केंद्रप्रमुख व अन्य पदाधिकारी, अधिकारी मेळावा नियोजन सर्व समिती प्रमुख व सर्व सदस्य जिल्ह्यातून आलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी व सर्व स्काऊट गाईड उपस्थित होते. विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त स्काऊट गाईड व शाळांचा गुणगौरव करण्यात आला. तर लहान गट व मोठा गट यामध्ये सर्वाधिक बक्षीसे प्राप्त करणाऱी शाळा डेविड इंग्लिश मिडीयम स्कूल चोंढी अलिबाग या शाळेला दोन्ही गटात या वर्षाचा चॅम्पियन ट्रॉफी मिळवण्याचा मान मिळाला.
या शाळेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन व कौतुक करण्यात आले. व चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. जिल्ह्यातून एका बेस्ट स्काऊट- स्काऊटर व बेस्ट गाईड- गाईडर पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उरण गटशिक्षणाधिकारी प्रियंका म्हात्रे मॅडम, अहोरात्र मेहनत घेणारे सोमीनाथ खरमाटे,एन आय स्कूल सर्व संचालक मंडळ जिल्हा स्काऊट गाईड कार्यालय पेण अधिकारी वर्ग,उरण तालुक्यातील माननीय पोलीस निरीक्षक पोलिस ठाणे उरण,सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती उरण, संजय होळकर आदर्श शिक्षक पी.एम.श्री.शाळा मुळेखंड,(पी.एमश्री.शाळांचे प्रमुख) सर्व समित्यांचे समिती प्रमुख शिक्षक बंधू भगिनी, उरण तालुका आरोग्य विभाग, श्रवण बिल्डिंग ए विंग, बी विंग, कीर्तन बिल्डिंग, सद्गुरू कृपा बंगला व जुईली मॅडम बंगला या इमारतीतील रूमचे मालक चार दिवस अखंड भोजन नास्ता, चहा देणारे व सर्व अन्न बनवणारे पुरुष महिला भगिनी यांच्या सहकार्यातून व मदतीने हा मेळावा यशस्वीरित्या दिमाखात पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संतोष दाते जिल्हा कार्यालय पेण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading