32 रायगड लोकसभा मतदारसंघात 10 लाख 9 हजार 567 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 60.51 टक्के मतदान झाले होते, यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 334 तर महिला मतदार 5 लाख 9 हजार 233 मतदार होते. मतमोजणीच्या अंतिम निकालाअंती सुनील तटकरे 82 हजार 784 मताधिक्याने विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी अनंत गीते हे पराभूत झाले आहेत
विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले अंदाजे मतदान पुढीलप्रमाणे आहे,
—————————————————-
191-पेण विधानसभा मतदार संघ
एकूण 3 लाख 3 हजार 308 इतके मतदार असून 1 लाख 95 हजार 653 मतदारांनी मतदान केले होते, यामध्ये 1 लाख 2 हजार 255 पुरुष तर 93 हजार 398 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतमोजणीच्या अंतिम फेरीत झालेले मतदान पुढीलप्रमाणे-
अनंत गीते : 66122
सुनील तटकरे : 112945
—————————————————-
192-अलिबाग विधानसभा मतदार संघ
एकूण 2 लाख 97 हजार 396 मतदार असून त्यापैकी 1 लाख 98 हजार 289 मतदारांनी मतदान केले होते, यामध्ये 1 लाख 629 पुरुष तर 97 हजार 660 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतमोजणीच्या अंतिम फेरीत झालेले मतदान पुढीलप्रमाणे-
अनंत गीते : 73568
सुनील तटकरे : 113804
—————————————————-
193- श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ
एकूण 2 लाख 62 हजार 266 मतदार असून त्यापैकी 1 लाख 55 हजार 254 मतदारांनी मतदान केले होते, यामध्ये 75 हजार 968 पुरुष तर 79 हजार 286 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतमोजणीच्या अंतिम फेरीत झालेले मतदान पुढीलप्रमाणे-
अनंत गीते : 57330
सुनील तटकरे : 86902
—————————————————-
194-महाड विधानसभा मतदार संघ
एकूण 2 लाख 84 हजार 386 मतदार असून त्यापैकी 1 लाख 63 हजार 696 मतदारांनी मतदान केले होते, यामध्ये 83 हजार 416 पुरुष तर 80 हजार 280 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतमोजणीच्या अंतिम फेरीत झालेले मतदान पुढीलप्रमाणे-
अनंत गीते : 74261
सुनील तटकरे : 77883
—————————————————-
263-दापोली विधानसभा मतदार संघ
एकूण 2 लाख 80 हजार 261 मतदार असून त्यापैकी 1 लाख 60 हजार 798 मतदारांनी मतदान केले होते, यामध्ये 75 हजार 810 पुरुष तर 84 हजार 988 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतमोजणीच्या अंतिम फेरीत झालेले मतदान पुढीलप्रमाणे-
अनंत गीते : 77503
सुनील तटकरे : 69071
—————————————————-
264-गुहागर विधानसभा मतदार संघ
एकूण 2 लाख 40 हजार 755 मतदार असून त्यापैकी 1 लाख 35 हजार 877 मतदारांनी मतदान केले होते, यामध्ये 62 हजार 256 पुरुष तर 73 हजार 621 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतमोजणीच्या अंतिम फेरीत झालेले मतदान पुढीलप्रमाणे-
अनंत गीते : 73626
सुनील तटकरे : 47090
32 रायगड लोकसभा मतदारसंघात १३ उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत झाली असून उमेदवारांची नावं, पक्ष, चिन्ह व झालेले एकूण मतदान पुढीलप्रमाणे–
झालेल्या आटातटीच्या लढतीत अनंत गीते यांना एकूण 4 लाख 25 हजार 568 मते मिळाली तर सुनील तटकरे यांना 5 लाख 8 हजार 352 इतकी मते मिळाली. सुनील तटकरे 82 हजार 784 ची आघाडी घेऊन पुन्हा विजय श्री खेचून आणण्यात यशस्वी झाले आहेत तर वंचितसह 11 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.